करोनाच्या पार्श्वभूमीच्या आधारावर अमळनेर तालुका फोटोग्राफर असोशियनच्या सदस्यांना रोटरी क्लब तर्फे मास्क वाटप
नूर खान
अमळनेर प्रतिनिधी:आता लग्न समारंभ चालू आहेत आणि फोटोग्राफर हा गर्दीचा ठिकाणी हा जात असतो त्यामुळे त्यांनी जास्त काळजी घेण्यची गरज आहे. त्यामुळे आपले आणि सर्व नागरिकांचे पण संरक्षण करू शकतो. करोनाच्या पार्श्वभूमीच्या आधारावर अमळनेर तालुका फोटोग्राफर असोशियन सदस्यांना रोटरी क्लब तर्फे मास्क वाटप करण्यात आले असुन कोरोना विषाणू बाबत आशिष चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी निकुंभ कॉम्पलेक्स मध्ये प्रेसिडेंट पूनम कोचर ,सेक्रेटरी वृषभ पारख ,प्रोजेक्ट चेयरमैन विशाल शर्मा,आशीष चौधरी ,विनोद जैन ,प्रदीप पारख, ज्ञानेश्वर भांडारकर व सर्व रोटरी मेम्बर्स व सर्व फोटोग्राफर सद्यस्य महेंद्र पाटील , भगवान पाटील, मुक्तार दादा, जयवंत ढवळे,किरण बागुल , भागवत पवार, युवराज पाटील, नूर खान,मनोज चित्ते, राजेंद्र(बबलू) पाटील, महेश पाटील, धीरज चव्हाण, राहुल चव्हाण विक्की जाधव आदी उपस्थिति होते.अमळनेर फोटो ग्राफर यांचा तर्फे मुक्तारदादा यांनी आभार मानले. आणि सर्व बांधवानी काळजी घेण्याचे त्यांनी आव्हान केले.






