Amalner

Amalner : चाकूने खून..! नातेवाईकांनी केला रस्ता रोको..आक्रमक आंदोलन कर्त्याना  कौशल्याने हाताळत पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात..!

Amalner : चाकूने खून..! नातेवाईकांनी केला रस्ता रोको..आक्रमक आंदोलन कर्त्याना कौशल्याने हाताळत पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात..!

अमळनेर शहरात आणि तालुक्यात दोन तरुणांचा वेगवेगळ्या कानावरून खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील दाजीबानगर भागातील अक्षय राजू भिल अंदाजे वय २० याला रात्री पाच ते सहाजणांनी पोटात चाकू मारल्याने त्याला उपचारसाठी धुळ्याला रवाना करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून मयताचा भाऊ दिपक राजू भिल वय २२ देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या वर धुळे येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान मयत अक्षय भिल याच्या नातेवाईक आणि आदिवासी भिल्ल समाजाने आज महाराणा प्रताप चौकात रस्ता रोको करत आंदोलन केले. याप्रसंगी आरोपीला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी आक्रमक आंदोलन कर्त्यानी केली. पोलिस अधिकारी डी वाय एसपी राकेश जाधव, प्र. पो नि राकेशसिंग परदेशी यांनी आंदोलन कर्त्यांशी बोलणी केली. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. महाराणा प्रताप चौक जवळ जवळ 3 तास बंद होता. आणि आंदोलन कर्ते आक्रमक भूमिकेत होते.

साधारण तीन महिन्यापू्वी अक्षय व दिपक ची बहीण छाया हिला पळवून नेल्याची घटना घडली होती. यावरून वादास सुरुवात झाली. आणि राहुल सरोदे, अर्जुन सरोदे ई नी दोघ भावां वर चाकूने वार केले. दरम्यान छाया भिल ही बेपत्ता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी राहुल नाना सरोदे, अर्जुन नाना सरोदे, रोहित चेतन सरोदे, कृष्णा चेतन सरोदे, आरती नाना सरोदे, नीताबाई चेतन सरोदे यांना अटक केली आहे. पोलिसात ३०२,३०७, आर्म ॲक्ट ४/२५ ह्या कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय अनिल भुसारे करत आहेत.

दरम्यान शहरात वातावरण तणाव पूर्ण झाले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी अधिक तणाव निर्माण होवू न देण्यात यश मिळवले आहे.डी वाय एसपी राकेश जाधव, प्र. पो नि राकेशसिंग परदेशी यांनी अत्यंत कौशल्याने परिस्थिती हातळल्याने आंदोलन कर्ते माघारी फिरले आणि वातावरण निवळले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button