?️ अमळनेर कट्टा…उपक्रमशिल शिक्षिका श्रीमती प्रेरणा प्रभाकर वडयाळकर जीवन गौरव 2021 पुरस्काराने सन्मानित
अमळनेर गरुड वाचनालय धुळे येथे शिवजयतीचे औचित्य साधुन धुळे जिल्हा कलापाध्यापक वेलफेअर सोसायटी व कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती याच्याकडुन राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार समारंभ सोहळा संपन्न झाला.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ.राजवर्धन कदमबांडे ,महापौर चद्रंकांत सोनार ,महाराष्ट्र युवा राष्ट्वादी काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत शिसोदे ,प्रो कबड्डी स्टार खेळाडु महेद्र राजपुत , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मा.गुरुदत्त चव्हाण , नगरसेवक विनायक शिदे ,अॕथलेटिक्स अध्यक्ष नरेद्र पाटील , सचिव हेमंत भदाणे ,श्री.संजय पाटील इ. मान्यवर होते….या कार्यक्रमात अमळनेर तालुक्यातील नामवत खा.शि.मं.च्या गंगाराम सखाराम हायस्कुल च्या उपक्रमशिल शिक्षिका श्रीमती प्रेरणा प्रभाकर वडयाळकर मॕडमाना सन्मांनाचा माॕसाहेब राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार २०२१ सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,शाल ,सुवर्ण पदक,बुके देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष मा.योगेश दादा मुंदडे ,कार्योपाध्यक्ष निरज भाऊ अग्रवाल, समन्वय समिती चेअरमन मा.हरी आण्णा वाणी , शालेय समिती चेअरमन मा.प्रदीप अग्रवाल , मुख्याध्यापक मा.पी एल मेखा ,उपमुख्याध्यापक मा.ए एस करस्कर ,पर्यवेक्षक डि व्ही महाले ,पर्यवेक्षक व्ही व्ही कुलकर्णी , शिक्षक प्रतिनिधी मा.डि एम दाभाडे , मा.बी एस पाटील , के पी पाटील सर व सर्व पदाधिकारी यानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.






