Amalner

?️अमळनेर कट्टा…दोन गटात हाणामारी..!मारवड पोलीस ठाण्यात 22 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल…

?️अमळनेर कट्टा…दोन गटात हाणामारी..!मारवड पोलीस ठाण्यात 22 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल…

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे दोन गटात वाळू चोरीची माहिती दिल्याच्या
संशयावरून तुफान हाणामारी झाली. एकमेकांना लाकडाच्या दांडूक्याने मारहाण केल्याने ११ जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटातर्फे मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या हाणामारीत वाळू चा संबंध असल्याने गावात काही काळ तणाव व भिती निर्माण झाली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे पांझरा नदीतून अवैध वाळूचा उपसा केला जातो. पोलिस व महसूल विभागाला याबाबती अनेक तक्रारी केल्या असून देखील योग्य ती कार्यवाही होत नसल्याने वेळोवेळी त्यांना माहिती दिली अश्या संशयावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. पुढे वादाचे रुपांतर मारामारीत झाले व दोन्ही गटातील लोकांना मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे.सुरुवातीला नदी पात्रात मारामारी झाली व नंतर गावात
देखील मारहाण झाली.

सर्वात पहिले फिर्यादी सागर अशोक कोळी ने दिलेल्या फिर्यादीवरून २५ जून रोजी दुपारी ३ वाजता नदीत पाईपलाईन बघायला गेलो असता तेथे वाळू भरताना ट्रॅक्टर दिसले. वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर हे नेहमी पाइपलाइन फोडून टाकत असल्याने त्यांची मोबाईल मध्ये शूटिंग घेत असताना ज्ञानेश्वर प्रकाश कोळी, राकेश वसंत कोळी, संदीप बापू कोळी, अमोल सुक्रम भोई, विकास सुभाष कोळी, योगेश हिलाल कोळी, सुरज राजेंद्र कोळी, भाऊसाहेब प्रकाश मगरे, समाधान वसंत कोळी, गोकुळ शिरसाठ, बबलू नामदेव बडगुजर यांनी फिर्यादीस तसेच काका भाऊ यांना पावड्या, लाकडी दांडक्याने, काठ्यांनी डोक्यावर, पायावर मारहाण करून जखमी केले.
दुसऱ्या फिर्यादीत ज्ञानेश्वर प्रकाश कोळी यांनी फिर्याद दिली की अशोक कोळी यांचे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडले होते. त्यांच्या मुलांनी माझ्यावर संशय घेतला होता व मला तू कशी वाळू भरतो अशी धमकी दिली म्हणून मी २५ रोजी माझ्या मित्रांसह नदीत ट्रॅक्टर मध्ये वाळू भरली तेव्हा सागर अशोक कोळी, विशाल अशोक कोळी, सोनू कोळी, अजय संजय कोळी, भैय्या श्रीराम कोळी, संजय ढोमण कोळी, मका ढोमण कोळी, विनोद अशोक कोळी यांनी ट्रॅक्टर अडवून फिर्यादी व त्याचे मित्र यांना मारहाण केली जखमी केले. दोन्ही गटाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय वैभव पेठकर करीत आहेत.

दोन्ही गटा तर्फे मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दंगली चा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक संदीप पेठकर , प्रकाश साळुखे , संजय पाटील , सुनील आगवणे, सुनील तेली , विशाल चव्हाण
यांच्या पथकाला मांडळ गावात पेट्रोलिंग लावून रात्री आरोपींची धरपकड सुरू होती.या घटनेमुळे गावात भिती चे वातावरण निर्माण झाले असून वाळू माफियांवर कारवाईची मागणी होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button