महाराष्ट्र मराठी 7 चा दणका
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर विभागांना आली जाग ..रस्त्याच्या कडेला माती मुरूम टाकणे सुरू .. काम सुरु असल्याचे लाल चिन्हे रस्त्यावर दाखल….
प्रा जयश्री साळुंके
अमळनेर दि 28 जाने 2020 रोजी महाराष्ट्र मराठी 7 ने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धुळे रोड वरील बांधकाम नियमांचे उल्लंघन करून रस्ता बांधकाम सुरु असल्याची बातमी प्रकाशित केली होती.

या बातमीत सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरू असल्याचे तसेच कोणतेही लाल चिन्ह ,सूचना फलक,रस्ता कोणत्या विभागाचा आहे? Arrow, दोन रस्त्याच्यामध्ये असलेल्या गॅप मुळे होणारे अपघात इ विषयांवर प्रकाश टाकून नागरिकांचे म्हणणे आपल्या ब्लॉग द्वारे मांडले होते.

आज वरील पैकी काही विषयांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा इतर विभागांचे या बातमी मुळे डोळे कान उघडले असून दोन रस्त्या मधील गॅप भरण्यात आली आहे तसेच दोन ठिकाणी काम सुरू असल्याचे चिन्ह ठेवण्यात आले आहेत. परंतु हे पुरेसे नसून लाल रंगाच्या रेडियम पट्ट्या तसेच कार्य सुरू असलेले पिवळे पट्टे लावून ही जागा आरक्षित करून आत कोणी जाणार नाही किंवा बाजूने जाणे असे बाण दाखविणारे फलक लावणे आवश्यक आहे. तरी लवकरात लवकर पुढील गोष्टी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग अंमलात आणेल अशी आशा आहे.






