Amalner

ग्रामीण भागात लॉकडाउन चा पडला विसर पोलिसांचा धाक गेला मोकाट फिरणाऱ्यांना कोनाचीही भीती नाही

ग्रामीण भागात लॉकडाउन चा पडला विसर पोलिसांचा धाक गेला
मोकाट फिरणाऱ्यांना कोनाचीहीभीती नाही

रजनीकांत पाटील

अमळनेर: कोरोनाच्या सारख्या आजाराला मिटवण्यासाठी साठी प्रशासन युद्धपातळीवर जोमाने दिवसरात्र काम सुरू असतांना देखील अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना काही घेणे देणे नाही. रोजची कोरोनाच्या आजाराने ने वाढती संख्या तसेच मृतांची संख्या या बाबत ग्रामीण भागात कोणाला फरक पडल्याचे दिसत नाही. सध्याच्या बिकट परिस्थितीत कोरोनाने तालुक्यात डोके वर करत चांगलेच पाय पसरवले असता कोणीही स्वतःची सुरक्षा घेण्यास तयार नाही. तोंडाला मास्क न बांधणे,सोशल डिस्टन्स न ठेवने विनाकारण घराबाहेर पडणे या बाबत सर्व प्रकार ग्रामीणकडे खेड्यात मोकाट चालू आहे रिकामटेकडे लोक गाडीवर कसे काय हिंडतात.त्यांना पेट्रोल कोण पुरवते? गावातील नागरिक घोळके करत उभे राहण्याचा व गावात फिरण्याचा वावर चंगलाच वाढत चालला आहे. या बाबत ग्रामीण खेड्यागावात होणारी पोलीस प्रशासनाच्या गाडी चा चक्कर देखील होत नसल्याने लोकांना आता अजिबात कुणाचा धाक उरला नाही. या बाबत खेड्यातील नागरिकांवरील पोलीस प्रशासनाचे लक्ष दूर होत आहे यामुळे ग्रामीण भागातील खेड्यातील नागरिक मोकाट झाले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button