Kolhapur

सुधीर बंडगर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

सुधीर बंडगर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

सुभाष भोसले-कोल्हापूर प्रतिनिधी

महात्मा फुले माध्यमिक विद्यालय आनूर चे क्रीडाशिक्षक सुधीर दत्तात्रय बंडगर यांना त्यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणीक कार्याबद्दल कोल्हापूर येथील न्युज पेपर गंगाधर यांच्या मार्फत 2019 सालचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला .त्यांच्या मार्गदर्शनामुळे बुलढाणा येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने दुसरा क्रमांक तर तालुकास्तरीय कबड्डीमध्ये मुलींच्या संघाने सलग आठ वर्षे प्रथम क्रमांक मिळविला.कुस्ती मध्ये विदयार्थ्यानी राज्यस्तरापर्यंत झेप घेतली.उत्कृष्ट कबड्डी पंच म्हणून त्यांनी काम केले आहे.हा पुरस्कार त्यांना मुख्य संपादक कमलाकर वर्टेकर ,संपतराव गायकवाड,अमोल देशपांडे यांच्या हस्ते तर राजाराम शिंदे,दत्तात्रय बंडगर,लक्ष्मण् खोत,कृष्णात गोते,बाळासाहेब चौगुले,राजश्री चौगुले,फुलाबाई बंडगर,प्रताप बंडगर,विनोद खोत,विमल खोत,विजय गावडे,बंडू बरगाले यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे प्राप्त झाला.सुधीर बंडगर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यावर आजी माजी विदयार्थी ,पालक,मित्र,नातेवाईक ,शिक्षक मित्र यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button