विश्वसंत डॉ.शिवमुनींजी यांचे वाढदिवसानिमित्त 39 दिव्यागांना कृत्रिम हात आणि पाय प्रदान ….
पुणे- राहुल खरात
सकल जैन संघ आणि भारत विकास परिषद,पुणे यांचे ह्यांच्या सौजन्याने व आचार्य सम्राट, प.पु.डॉ. शिव मुनीजी म.सा. ह्यांच्या चातुरमासा निमित्त उभारलेल्या अतिभव्य वर्धमान सांस्कृतिक भवन कोंढवा,पुणे येथे डॉ. शिवमुनी जी म.सा.यांच्या वाढदिवसानिमित्त , 350 दिव्यांगांचे नुकतेच मोफत शिबिर घेतले होते त्यामधील 39 दिव्यागांना आज 5ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी 12 वाजता पांडेचरीचे राज्यपाल किरणजी बेदी यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये कृत्रिम हात, पाय,जयपूर पुट आणि कॅलिभरचे मोफत प्रदान करण्यात आले.यावेळी
विजयकांतजी कोठारी
अध्यक्ष , सकल जैन संघ, पुणे
दत्ताजी चितळे,राष्ट्रीय उपाध्यक्ष भारत विकास परिषद
राजेंद्रजी जोग राष्ट्रीय सचिव ,महाराष्ट्र, भारत विकास परिषद.
विनयजी खटावकर
विकलांग केंद्र प्रमुख,सुशीलबेन शहा चॅरिटेबल ट्रस्ट चे मोतीलालजी शहा उपस्थित होते.
दिव्यांगांसाठी मोफत भारत विकास परिषदेने, पुणे येथे, कायमस्वरूपी विकलांग पुनर्वसन केंद्र सन 1995 पासून चालू केले बद्दल राज्यपाल किरण बेदी यांनी अभिनंदन करून ही एक चांगली मानव सेवा असल्याचे म्हंटले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रवीण भाई दोशी, अध्यक्ष दीपक गुंदेचा,शैलेश शहा यांनी केले तर मोलाचे सहकार्य वासुदेव कालरा, जयंत जेष्टे,प्रशांत सातपुते,विजय गोरे, यांनी केले तर आभार प्रदर्शन रघुनाथ ढोक ,अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन यांनी मानले






