Amalner

अमळनेर तालुक्यातील आनोरे गावालाभारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे पाण्याचे नियोजन व उपाययोजना बाबत राष्ट्रीय जलपूरस्कार

प्रतिनिधी :

अमळनेर : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे पाण्याचे नियोजन व उपाययोजना बाबत राष्ट्रीय जलपूरस्कार देण्यात आले त्यात पश्चिम विभागातील उत्कृष्ट खेडे म्हणून अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाला ऑनलाईन पुरस्कार जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या उपस्थितीत देण्यात आला
100 टक्के रेन वॉटर हार्वेस्टिंग , शोष खड्डे , गावातील पाणी गावातच अडवण्यासाठी उपाय योजना बाबत आनोरे गावाची निवड करण्यात आली असून देशातील पश्चिम विभागात त्यांचा दुसरा क्रमांक आला आनोरे ग्रामस्थांनी ऑनलाईन पुरस्कार सोहळा पाहिला पुरस्कार मिळताच गावकऱ्यांनी जल्लोष केला पुरस्कार वितरण दिल्ली येथील जल मंत्रालयातून करण्यात आला त्यावेळी उपराष्ट्रपती एम व्यंकैया नायडू , सामाजिक न्याय व जलशक्ती राज्य मंत्री रतनलाल कटारिया , सचिव यु पी सिंह हजर होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button