Amalner

शिरूड हायस्कूल चे मुख्याध्यापक जे.एम पाटील सेवानिवृत्त

शिरूड हायस्कूल चे मुख्याध्यापक जे.एम पाटील सेवानिवृत्त

रजनीकांत पाटील

अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील विनायकराव झिपरु पाटील हायस्कूल शिरूड चे मुख्याध्यापक श्री जे एम पाटील सर यांनी 33 वर्षाचा प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले शिरूड गावचे रहिवासी असून त्यांनी 25 वर्ष सेवा ही गावातच बाजावली त्यांचा मराठी व मराठी व्याकरण आवडीचा विषय ते अर्थशास्त्र हा विषय देखील आवडीने शिकवत त्यांनी स्वतःच्या तसेच इतर विषयाच्या अध्ययनाची जबादारी देखील चांगली सांभाळली.

ते क्रिडा शिक्षण म्हणून देखील चांगले कार्यरत होते व त्यांनी त्या विषयांची देखील विद्यार्थ्यांना गोळी लावून दिली सामाजिक कार्याची देखील चांगली आवड विविध सामजिक कार्यक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग तसेच शाळेतील झाडे झुळपे यांचे संगोपना ची देखील देखरेख त्यात त्यांना मोठी आवड होती त्यांच्या सेवानिवृत्त मुळे शिरूड परिसरातील मान्यवर तसेच शिक्षकांकडून,कर्मचारी वर्ग गावतील मान्यवर यांनी आज लॉक डाउन चे नियम पाळत समक्ष व काहींनी फोन, मेसेजेस ने सोशल मीडिया च्या माध्यमाने भावी वाटचाली साठी शुभेच्छांचा वर्षव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button