Amalner

अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्य नेहमीच उल्लेखनीय असते – डॉ. अनिल देशमुख

अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्य नेहमीच उल्लेखनीय असते – डॉ. अनिल देशमुख

रजीकांत पाटील अमळनेर

अमळनेर ; जळगाव जिल्ह्यातील अमळनेर ग्राहक पंचायत ग्राहक हिताचा व समाजसेवेचा केंद्रबिंदू आहे. परम पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमी येथील माणसं सगळीच भारावलेली असतात. या अमळनेरच्या मातीने अनेक समाजसुधारक निर्माण केले आहेत. या मातीतील कार्यकर्त्यांचा समूह म्हणजे अमळनेर तालुका ग्राहक पंचायत होय. अमळनेर येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मागील सहा वर्षात ग्राहक हिताचे अनेक उपक्रम राबविले याचा मला जिल्हाध्यक्ष म्हणून सार्थ अभिमान आहे. माजी तालुकाध्यक्ष मकसूदभाई बोहरी व तालुका संघटक राजेंद्र सुतार यांनी पूर्वनियोजित संकल्पास अनुसरून तीन वर्षासाठी महिला कार्यकारिणी निवडली ही बाब अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविली जाणार आहे अशा आशयाचे मूलभूत विचार जळगाव जिल्ह्याची ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख यांनी अमळनेरच्या बैठकीत व्यक्त केले. या बैठकीस खान्देश शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन डॉ. बी. आर. बाविस्कर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे, जिल्हा सचिव एडवोकेट सुभाष तायडे व निवृत्त जिल्हा न्यायाधीश गुलाबराव पाटील हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
या बैठकीत कार्यकर्त्यांना मौलिक मार्गदर्शन जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे, जिल्हा सचिव एडवोकेट सुभाष तायडे, खान्देश शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन डॉक्टर बी आर बाविस्कर, माजी जिल्हा न्यायाधीश गुलाबराव पाटील आदींनी केली यावेळी अंमळनेर एमआयडीसीचे चेअरमन जगदीश चौधरी, लाडशाखीय वाणी समाजाचे अध्यक्ष महेश कोठावदे, पत्रकार ईश्वर महाजन, सु.हि.मुंदडे हायस्कूल मारवडचे शिक्षक योगेश पाने सर, जळगाव चे एडवोकेट कैलास भाटिया, अविनाश कोतवाल यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी तालुका संघटक राजेंद्र सुतार, प्रास्ताविक तालुका अध्यक्षा सौ.भारती अग्रवाल व आभार प्रदर्शन सचिव सौ कपिला मुठे यांनी केले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा अल्पपरिचय सौ. वनश्री अमृतकार , सौ. ज्योती भावसार, सौ कपिला मुठे यांनी केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. एडवोकेट सुभाष तायडे यांनी भैरवी रागाच्या गीताने कार्यक्रमाची सांगता केली. सौ कपिला मुठे यांनी या प्रसंगी संघटन मंत्र व विसर्जन मंत्र म्हटले. जिल्हा कार्यकारणी मध्ये अमळनेरचे मकसूदभाई बोहरी, राजेंद्र सुतार, विजय शुक्ल, सुनील वाघ, एडवोकेट सौ. भारती अग्रवाल व सौ कपीला मुठे यांचा समावेश झाल्यामुळे त्यांच्याही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षा एडवोकेट सौ. भारती अग्रवाल, तालुका संघटक सौ करुणा सोनार, सचिव सौ कपिला मुठे, सहसचिव ज्योती भावसार, कोषाध्यक्षा सौ. वनश्री अमृतकार, सौ अंजू ढवळे, सौ मेहराज बोहरी तसेच मकसूद भाई बोहरी, राजेंद्र सुतार, विजय शुक्ल, योगेश पाने सर, ताहा बुक वाला, खदीर सादिक, मधुकर राव सोनार, सतीश मुंडके, दीपक तिवारी, डॉ. रमेश वानखेडे अनिल घासकडबी, अरविंद मुठे, विवेक देशमुख, माजी केंद्रप्रमुख श्रीमती विमलताई मैराळे, डॉ. अमित देशमुख, अविनाश कोतवाल आदी सभासद उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button