? रणधुमाळी ग्रामपंचायतीची…अमळनेर येथे 1181 अर्ज दाखल..5 ग्रामपंचायत बिनविरोध..!
अमळनेर तालुक्यातील67 ग्रामपंचायतीच्या जागांसाठी आज शेवटच्या दिवशी एकूण 829 (चार ग्राम पंचायत बाकी)अर्ज दाखल झाले आहेत. या आधी काल पर्यंत एकूण 352 अर्ज दाखल झाले आहेत.आज ग्राम पंचायत च्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.आज संध्याकाळ पर्यंत 829 अर्ज चार ग्राम पंचायत चे मोजणी बाकी असताना दाखल झाल्याची माहिती अमळनेर चे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिली आहे.उद्या छाननी ची करण्याची तारीख असून दि 4 जाने माघार घेण्याची संधी आहे.
अमळनेर तालुक्यातील 67 ग्राम पंचायत च्या निवडणुकीच्या धामधुमीत एकूण 5 ग्राम पंचायत बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत. यात एकतास, हिंगोणे प्र ज ,कुर्हे बु,कलाली, जळोद ह्या 5 ग्राम पंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आज निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.ऑनलाइन सेवा विस्कळीत झाल्याने ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले.यामुळे एनवे अधिकारी आणि कर्मचारी यांची चांगलीच धावपळ झाली आहे. रात्री उशिरापर्यंत चार ग्राम पंचायत चे अर्ज मोजणी सुरू होती.






