?️ अमळनेर कट्टा… दिंडी चालली चालली गजाननच्या दर्शनाला…..
अमळनेर : अमळनेर मुंदडा नगर येथील संत गजानन महाराज मंदिर येथील गजानन भक्तांची पायी दिंडी शेगावला रवाना झाली.. सकाळी सहा वाजता डॉ प्रशांत शिदे यांना सहपत्निक आरती व पालखीचा मान दिला गेला. दिंडीला त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले. त्यांचा सहपत्निक सत्कार सुभाष भांडारकर, प्रा.आर.बी पवार व ज्योती पवार यांनी केला.
मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एल.जे.चौधरी यांनी दिंडीतील गजानन भक्तांना सुचना देऊन शिस्तबद्ध पद्धतीने दिंडी जावी अशा सुचना करत कोरोनाच्या पाश्वभूमीवर सहकार्य करावे व नियमांचे पालन करण्यासाठी सांगितले.
गजानन महाराज मंदिरापासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंडी निघाली.अमळनेर तालुक्यातील अनेक गजानन भक्त यांनी दिंडीत सहभाग नोंदवला. संत गजानन महाराज जयघोषाने नागरिक व महीलांनी घोषणा दिल्या. विदयाविहार काँलनी, पटवारी काँलनी महीलांनी दिंडीच्या स्वागतासाठी अंगणात रांगोळी काढत दिंडीत सहभागी झाल्या.
यावेळी अशोक भावे,नितीन भावे,रघुनाथ पाटील, आर.टी.बागूल, संजय साळुंखे, महेश भाऊसाहेब, राजेंद्र शिंदे,सुनील बोरसे, ईश्वर महाजन, कदम काका, छाया शिंगाणे, वंदना भारती, शोभा पाटील, सिमा साळुंखे, बबिता पवार, कोळी गजानन भक्त उपस्थित होते.







