Chandwad

गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष रेणुका मातेच्या चरणी लीन

गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष रेणुका मातेच्या चरणी लीन

उदय वायकोळे चांदवड

आज दि 21 जानेवारी गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार श्री चंद्रकांत आर पाटील हे चांदवड येथील रेणुकादेवी मंदिरात आले असता त्यांनी सपत्नीक रेणुका मातेचे दर्शन घेतले.तसेच आज शनिवार शनी अमावस्या असल्याने चांदवड शहरापासून 10 किमी अंतरावर असलेले वरदडी येथील प्राचीन शनिमंदिर येथे जाऊन दर्शन घेतले.खासदार चंद्रकांत पाटील हे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष असले तरी ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील असून जळगाव धुळे नाशिक परिसरात त्यांचे नातेसंबंध आहेत.
श्री पाटील यांचा दौरा नेमका नाशिक पदवीधर निवडणूक काळात आल्याने नेमके काही विशेष कारण की फक्त देवदर्शन हे स्पष्ट होऊ शकले नाही.यावेळी चांदवड प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण(भैय्या)कासलीवल, डॉ श्री प्रशांत पाटील,विक्रांत चांदवडकर,भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे,भाजप सोशल मीडिया संयोजक विशाल ललवाणी आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button