अहिल्यादेवींच्या महेश्वरात चुंबनाचे सीन हिंदूंच्या भावनां दुखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल !
गृहमंत्री नरोत्तम मिश्रांनी दिले चौकशीचे आदेश
दत्ता पारेकर पुणे
पुणे : OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली मीरा नायर दिग्दर्शीत वेब सीरीज ‘अ सूटेबल बॉय’ वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मध्यप्रदेशातील रीवामध्ये नेटफ्लिक्सविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप नेते गौरव तिवारी यांनी आरोप लावला आहे की, वेब सीरीजमध्ये हिंदूंच्या भावनांना ठेस पोहचवण्यात आली आहे. तसेच, महेश्वरच्या घाटांवर लव्ह जिहादला चालना देणारे सीन शूट करण्यात आले आहेत.
वेब सीरीजमध्ये इशान खट्टर आणि तब्बू यांच्यात रोमांस दाखवण्यात आला आहे. इशान सीरीजमध्ये मान कपूर हे पात्र साकारत आहे, तर तब्बू सईदा बाईच्या रोलमध्ये आहे. रणवीर शौरी सीरीजमध्ये वारिस तर विजय वर्मा रशीदचे पात्र साकारत आहे. सीरीजमध्ये आंतरधर्मीय प्रेमाला दाखवल्यामुळे मध्यप्रदेशातील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव तिवारी यांनी आक्षेप नोंदवला आहे.
गौरवने सीरीजमधील अनेक सीन्स आणि पोलिसांकडे केलेली तक्रार ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी लोकांना नेटफ्लिक्स डिलीट करण्याची अपीलदेखील केली आहे. काही दिवसांपूर्वी एकता कपूर नामक निर्मातीने अशीच एक अश्लील वेब सीरीज बनवली होती व त्यामध्ये लेडीज हॉस्टेल दाखवण्यात आले होते व त्याचे नाव अहिल्याबाई होळकर असे दाखवण्यात आले होते. या वर खासदार विकास महात्में यांनी केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन संसदेत या बाबत आवाज उठवला होता व या पुढे अशा घटना व अश्लील वेबसीरीजच्या निर्मितीला लगाम लावण्यासाठी व त्यावर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केलेली होती. अशातच या अ सूटेबल बॉय’या वेबसीरीज च्या निर्मिती मुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे.






