Kolhapur

सुमित्रा फराकटे गरूड भरारी फौडेंशनच्या आदर्श उदयोजिका पुरस्काराने सन्मानित .खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न .

सुमित्रा फराकटे गरूड भरारी फौडेंशनच्या आदर्श उदयोजिका पुरस्काराने सन्मानित .खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न .

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : गरुडभरारी एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन’च्या 11व्या वर्धापन दिना निमित्त 16 मान्यवरांना राज्यस्तरीय गरुडभरारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यावेळी गरुडभरारी शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशनही खासदार धैर्यशील माने व आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .शाहू स्मारक भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून झाली. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक गरुडभरारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले.यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले , गरुडभरारी पुरस्काराने सत्कारमूर्तीना ‘ स्व ‘ ची जाणीव करून दिली आहे .स्वतःला सिद्ध करून यशाचे शिखर गाठले पाहिजे .आपण आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवून समाजाच्या हितासाठी योगदान देणे गरजेचे आहे . आपला भारत देश व येथील समाज हा माझा आहे ही जाणीव ठेवून काम केल्यासच आपले जीवन सत्कारणी लागेल . आपण कोणाच्या घरात जन्माला आलो यावरून आपली उंची ठरत नसून आपण काय कर्तुत्व गाजवतो यावर आपली उंची ठरत असते . त्यामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करा असे उदगार खासदार धैर्यशील माने यांनी काढले.गरुडभरारी फाऊंडेशनने समाजाच्या विविध स्तरांत आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवलेल्या सोळा व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा योग्य सन्मान केला आहे . तसेच गरुडभरारी दिनदर्शिका ही प्रत्येकाच्या घरात असावी अशी अत्यंत उपयुक्त दिनदर्शिका असून गेली दहा वर्षे हि दिनदर्शिका मोफत शाळा , शिक्षक व सामाजिक संस्थांना देण्याचा एक चांगला उपक्रम गरुडभरारी फाउंडेशने राबविला आहे असे गौरवोद्गारही खासदार धैर्यशील माने यांनी काढले. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गरूड भरारी फौडेंशनचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला . सोशल सर्कल मल्टीपर पज सोसायटी व माझे माहेरच्या अध्यक्षा सुमित्रा फराकटे यांनी महिलांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्याची दखल घेवून सुमित्रा संदीप फराकटे यांना यशस्वी महिला उद्योजिका या पुरस्काराने सन्मानीत करणेत आले.मानपत्र, कोल्हापुरी फेटा, पुस्तक, गुच्छ या स्वरूपात गौरविण्यात आले. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, गरुडभरारी फाऊंडेशनचे शैक्षणिक व सामाजिक कार्य समाजाला दिशादर्शक आहे. निरपेक्ष भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन एक आदर्श पायंडा गरुडभरारी फाऊंडेशनने पाडला आहे असे प्रतिपादन ऋतुराज पाटील यांनी केले. यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी बोलताना , गरुडभरारी फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.चंद्रकुमार नलगे होते . यावेळी सन 2020 मध्ये दहा हजार किलोमीटर सायकलिंग केल्याबद्दल भूलतज्ञ डॉ. राजेश चव्हाण, कु.प्रनीत चव्हाण व अन्य पाच सायकलपटूना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमास निपाणी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ.नीता विनोद बागडे , डॉ. टी. एस. कडवेकर, गरुडभरारी फाऊंडेशनचे संचालक सुनील चव्हाण , रवींद्र मोरे ,फाऊंडेशनचे अन्य संचालक व विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.आभार रवींद्र मोरे यांनी मानले. सूत्रसंचालन बाळाराम लाड यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button