Amalner

?️ अमळनेर कट्टा..ग्राम पंचायत निवडणुकी दरम्यान बेकायदेशीर आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणाऱ्या घनश्याम पाटील व साथीदारांवर गुन्हा दाखल करावा..महेंद्र बोरसे यांची मागणी

?️ अमळनेर कट्टा..ग्राम पंचायत निवडणुकी दरम्यान बेकायदेशीर आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणाऱ्या घनश्याम पाटील व साथीदारांवर गुन्हा दाखल करावा..महेंद्र बोरसे यांची मागणीअमळनेर ग्रामपंचायत सात्री, ता.अमळनेर येथील नागरिक असुन सदर निवडणुकीचे कामी सदस्यपदाकरीता उमेदवारी करीत आहे. सदर निवडणुकीचे कामी काल दिनांक १५/१/२०२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली, सदर मतदान प्रक्रियेचे वेळी मतदान केंद्रामध्ये मी स्वतः मतदानाचा हक्क बजावणेसाठी गेलो, त्यावेळी सदर मतदान केंद्रामध्ये अमळनेर येथील घनशाम जयवंतराव शिरसाठ (पाटील) नामक नगरसेवक, नगरपरिषद, अमळनेर रा. ढेकु रोड, अमळनेर हा त्याचेसह अज्ञात ८ ते १० इसम घेवून मतदान केंद्रामध्ये बेकायदेशीररित्या सर्वांनी प्रवेश केला व त्याठिकाणी मतदान प्रक्रिये कामी उपस्थित मतदारांना तसेच मला दमदाटी करुन बेकायदेशीरपणे आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करुन सदर ठिकाणी
वाद निर्माण केले व त्या कारणाने सदर ठिकाणी गोंधळ निर्माण होवून शांततेचा भंग झाला त्यावेळी सदर ठिकाणी आपण नेमलेल्या मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष व सर्व इतर सहकारी कर्तव्यावर हजर होते, तसेच पोलीस कर्मचारी देखील हजर होते, त्यांचे समक्ष सदरचा प्रकार घडलेला आहे. परंतु अद्याप पावेतो सदर गोंधळ निर्माण करणारे अमळनेर येथील घनशाम जयवंतराव शिरसाठ (पाटील) व त्याचे अज्ञात ८ ते १० साथीदारांविरूध्द त्यांनी त्यांना मतदार अथवा गावाचे नागरिक म्हणुन मतदान केंद्रामध्ये प्रवेश करण्याचा तसेच सदर ठिकाणी वाद निर्माण करुन शांततेचा भंग करण्याचा कोणताही अधिकार नसतांना देखील त्यांनी सदर मतदान केंद्रामध्ये प्रवेश करुन मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण केलेत तसेच वाद निर्माण केलेत म्हणुन
आतापर्यंत कोणतीही कायदेशीर कार्यवाही आपल्या प्रशासनामार्फत करण्यात आलेली नाही.तसेच पोलीस प्रशासनाने देखील त्याविरूध्द कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल केलेला नाही. वर नमुद घनशाम जयवंतराव शिरसाठ (पाटील) यांचेवर यापूर्वी देखील अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन त्यांच्यावर यापुर्वी MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे व त्यांना मागील काही काळासाठी हद्दपार करण्यात आलेले होते. त्यामुळे अशा सराईत गुन्हेगारावर कडक कायदेशीर कारवाई होणे आपलेकडुन अपेक्षीत आहे.
तरी घनशाम जयवंतराव शिरसाठ (पाटील) व त्यांचे इतर साथीदारांविरूध्द तात्काळ
गुन्हा दाखल करण्याकामी आपण स्वत: अथवा आपले प्रतिनिधीमार्फत गुन्हा दाखल करण्याचे कामी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असा विनंती पूर्वक तक्रार अर्ज महेंद्र बोरसे रा सात्री, ता अमळनेर यांनी दिली आहे.?️ अमळनेर कट्टा..ग्राम पंचायत निवडणुकी दरम्यान बेकायदेशीर आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणाऱ्या घनश्याम पाटील व साथीदारांवर गुन्हा दाखल करावा..महेंद्र बोरसे यांची मागणी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button