Amalner

शिरूड येथे सामाजिक अंतर राखत साध्या व उत्कृष्ट पध्दतीने पार पाडला विवाह सोहळा

शिरूड येथे सामाजिक अंतर राखत साध्या व उत्कृष्ट पध्दतीने पार पाडला विवाह सोहळा

रजनीकांत पाटील

अमळनेर- तालुक्यातील शिरूड येथे माळी समाजाचा घरगुती वातावरणात ठरावीक आप्तेष्ट व घरगुती नागरिकांच्या उपस्थितीत सामायिक अंतर व नियमांचे काटेकोर पालन करीत आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.

शिरूड येथील रहिवासी लक्ष्मण श्रावण महाजन यांचे चि. दिपक तसेच शिरूड गावातीलच राहणारे छबिलाल आत्माराम महाजन यांची कन्या चि.सौ.का.दिपाली यांचा विवाह दि.14 जून रोजी ठरवले असता दीपक संग दिपाली हे लग्न गावातल्या गावात गल्लीत ल्या गल्लीत नात्यातील बंधनात जमले असून मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थितीत पाहता कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा बसावा म्हणून बाहेरील गर्दी न होता साध्या व सिम्पल पद्धतीने घरगुती नातेवाईकांच्या मध्यस्थी करत साध्या पद्धतीने सामाजिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळून हा आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.

यावेळी गावातील माजी सरपंच महेंद्र पाटील,डी ए धनगर,अमित अहिरे,अरुण मोरे,लक्ष्मण महाजन, छबिलाल महाजन,प्रवीण शिंपी, उपस्थित होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button