?️ अमळनेर कट्टा अमळनेर शहरात उभारण्यात आले ई-बाईक व कार साठी मोफत चार्जिंग स्टेशन माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नगरपरिषदेचा उपक्रम लोकनियुक्त नगराध्यक्षा व आजी माजी आमदारांची उपस्थिती
अमळनेर : पर्यावरण रक्षणासाठी व संतुलनासाठी राज्यात माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे,यात अमळनेर नगरपरिषदेने देखील सक्रिय सहभाग घेतला असून, पर्यावरण संगोपनाच्या एक घटकांपैकी महत्वाच्या अशा म्हणजेच शहरातील प्रदूषण कसे कमी करता येऊ शकते.राज्य शासनाच्या निर्देशानुसार नगरपरिषद क्षेत्रात विद्युत वाहने (ई बाइक/ कार)यांना प्रोत्साहन देणे कामी मोफत चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम अमळनेर नगरपरिषद मार्फत घेण्यात आलेले होते याचे उदघाटन २६ जानेवारी रोजी करण्यात आले. शहरातील मुख्य चौकात मोफत चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.याची सुरवात नगरपरिषदेच्या वाहनतळापासून करण्यात आली आहे.
विद्युत वाहन (इ बाइक/कार) साठी आपण डायरेक्ट 230v वीजपुरवठा देऊ शकत नाही, विद्युत वाहनासाठी डी.सी (डिजिटल करंट) १२ होल्ट वीजपुरवठा आवश्यक असतो.चार्जिंग स्टेशन उभारणी कामी डी.सी वीज पुरवठा उभारण्याचे काम किचकट व खर्चिक असते, एका स्टेशन साठी रुपये दीड लाख खर्च अपेक्षित असतो. सदर खर्च कमी करण्यासाठी लाकूड व पत्राचा वापर करून नगरपरिषदेने कमी खर्चात चार्जिंग स्टेशन डिझाईन केले आहेत, शहरात असलेल्या सर्व विद्युत वाहन(इ-बाईक/कार) यांचे चार्जर उपलब्ध करून देण्यात आले आहे व त्यास समान सामान्य घरगुती 230v वीजपुरवठा देण्यात आलेला असून सदर एक चार्जिंग स्टेशन उभारणी कामी २० हजार रूपयांपेक्षा कमी खर्च आलेला आहे. एक बाईक पूर्ण चार्ज करणे कामी चार ते पाच वीज युनिट खर्च अपेक्षित आहे,एकदा फुल चार्ज झालेले इ-वाहन चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर चालेल, सदर चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण माननीय आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.सदर कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील,जि.प.सदस्या जयश्री पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ,मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,अभियंता प्रशांत ठाकूर,नगरसेवक मनोज पाटील,संजय चौधरी व नगरपरिषदेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






