?️ Big Breaking..अमळनेर ने गाठला दहाचा आकडा..
अमळनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 10 वर पोहचली आहे.जळगांव जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात 21 एप्रिल रोजी कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या तीनही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे.जळगांव जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 इतकी झाली असून एकट्या अमळनेर तालुक्यात 10 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील या रुग्णांपैकी एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरित 10 रुग्ण कोरोना संसर्ग कक्षात उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैंरे यांनी दिली.






