चंद्र मंगळ पीधान योग कोल्हापूरकरांनी अनुभवला
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : एप्रिल , आज चंद्राच्या मागे मंगळ लपणार होता, नियोजित वेळेप्रमाणे सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी मंगळ चंद्राच्या वरील अंधार्या कोरीच्या मागे लपला, परंतु क्षितिजाशेजारीच चंद्रापासून 60 अंशावर सूर्य असल्यामुळे उघड्या डोळ्यांनी लोकांना अंधुकंसा चंद्र दिसला, त्यामुळे मंगळचे लपणे निरीक्षकांना पाहता आले नाही, परंतु सायंकाळी अंधार पडल्यावर सात वाजून 24 मिनिटांनी चंद्राच्या प्रकाशमान खालच्या बाजूच्या कोरी मागून मंगळ बाहेर पडत असलेले आणि क्षणाक्षणाला या दोघांमधील अंतर वाढत गेलेले निरीक्षकांना पाहत आले , कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील बहुसंख्य निरीक्षकांना आकाश निरभ्र असल्यामुळे आपापल्या घराच्या गच्चीवरून आणि मैदानावरून पीधान सुटत असलेला दुर्मिळ, विलोभनीय, अद्भुत नजारा पाहता आला, किरण गवळी खगोल अभ्यासक कोल्हापूर यांचे सोबत वैभव राऊत, डॉ, राजेंद्र भस्मे , विजय ससे, यश आंबोळे, यांनी शक्तिशाली दुर्बिणीतून निरीक्षणे केली , नोंदी घेतल्या व प्रकाशचित्रण केले,
किरण गवळी, खगोल अभ्यासक , कोल्हापूर , 9922666111






