Kolhapur

“राष्ट्रमाता जिजाऊ याच्या जयंती निमित्त भारत सरकार निगडित ,महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त!”

“राष्ट्रमाता जिजाऊ याच्या जयंती निमित्त भारत सरकार निगडित ,महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त!”

राजेश सोनुने

कोल्हापुर येथे जन कल्याण समितीच्या वतिने सौ.कविता कोळी यांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान व सौ. सुनंदा पाटील याना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला. याचे औचित्य साधून ईगल फौंडेशन च्या महिला जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

“एका ज्ञानी स्त्रीकडून दुसऱ्या दोन कार्यशील स्त्रीयांचा हा सन्मान!” हा सन्मान ईगल फौंडेशनच्या कार्यासाठी कायमच अभिमानास्पद असेल.
कल्याण सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य,यांचे तर्फे सौ.कविता कोळी यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्काराने व सौ. सुनंदा पाटील यांना आदर्श शिक्षिका या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी मा. आमदार, कॅबिनेट मंत्री राजनजी क्षीरसागर , राष्ट्रीय किर्तनकार भगवान कोकरे, टीव्ही कलाकार प्रफुल गवस,कोल्हापूर शिवसेना जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी सरनाईक, जणकल्याण अध्यक्ष उदयसिह पाटिल हे उपस्थित होते. या मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. *सौ.कविता कोळी*, *वाल्मिकलव्य सेना प्रदेशाध्यक्षा*, *ईगल फोन्डेशन धुळे महिला संघटक* *अन्याय अत्याचार निर्मूलन समिती धुळे जिल्हा कार्याध्यक्षा* असून त्यांनी धुळे जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button