?️अमळनेर कट्टा..उद्या पासून दोन दिवस कडक लॉक डाऊन..!शहरात ह्या भागात लावले बॅरिगेट्स..!
अमळनेर येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या अनुषंगाने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. परंतु लोक नियमांचे वारंवार उल्लंघन करत आहेत. प्रशासन अजूनही कठोर भूमिकेत नसून नुसतीच चालढकल सुरू आहे. एकाला नियम दुसऱ्याला पावती आणि तिसरा खिसा गरम करून आपला व्यवसाय सुरू च ठेवत आहे.परिणामी गावात गर्दी कमी होत नसून एकमेकांच्या अंगावर काम ढकलण्याची प्रवृत्ती आढळून आली आहे. एकूणच या बेशिस्त पणामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी उद्या पासून दोन दिवस कडक लॉक डाऊन करण्याचे आदेश दिल्या नंतर आज अमळनेर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे आणि उद्या पासून कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. अमळनेर येथील भाजी बाजार , लाल बाग शॉपिंग ,गंगा घाट या भागात बॅरेकेटिंग लावण्यात आले आहेत यामुळे उद्यापासून गर्दी कमी होईल.असा अंदाज आहे.तसेच अनेक व्यापाऱ्यांनी लॉक डावूनला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्या पासून दोन दिवस सर्वच बाबतीत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.






