Amalner

?️अमळनेर कट्टा..खायके पान बनारस वाला..खुल जाये अतिक्रमण का ताला…!”मातृछाया” पान टपरीला कोणत्या राजभवन “मातेचे”की दादाचे अभय..!जाणून घ्या पान टपरीची कथा..!

?️अमळनेर कट्टा..खायके पान बनारस वाला..खुल जाये अतिक्रमण का ताला…!”मातृछाया” पान टपरीला कोणत्या राजभवन “मातेचे”अभय..!

अमळनेर येथील गरीब गरजू जनतेवर अतिक्रमण हटाव मोहिमेचा बडगा चालवून सुरू असलेले उद्योग धंदे बंद करून,राहत्या घरांवर जेसीबी फिरवून कुटुंबाना वाऱ्यावर सोडून,अतिक्रमण हटाव च्या नावाखाली मनमानी कारभार करून सामान्य जनतेला वेठीस धरणारी अमळनेर नगरपरिषद प्रतिष्ठित ,उच्चभ्रू लोकांच्या अतिक्रमणास हात लावण्यास धजावत नाही.याची अनेक उदा अमळनेर जनतेच्या नजरेसमोर आहेत.असे लोक आणि त्यांची अतिक्रमणे देखील जनतेला माहीत आहे. परंतु यात आता नगरसेवकांची भर पडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अमळनेर येथील मुख्य लाल बाग शॉपिंग बाजारपेठेत भुरा पाटील उर्फ संतोष भगवान पाटील यांची मातृछाया पान टपरी भर रस्त्यात अस्तित्वात आहे. सर्व अतिक्रमणे काढून टाकले असले तरी ही पान टपरी काही रस्त्यातून बाजूला होत नाही. विशेष म्हणजे ही पान टपरी तांबेपुरा अमळनेर येथील नगरसेवकाची असल्याची माहिती मिळाली आहे. गावात अशी चर्चा आहे की सदर पान टपरी धारकाला ही टपरी हटविण्यासाठी गीता प्रोव्हिजन च्या मागे असलेल्या म गांधी शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या जवळ दोन पत्र्याच्या शेड अनधिकृतपणे उभारून घेण्यास परवानगी दिली आहे. आता ह्या पत्र्याच्या शेड संबधित पान टपरी धारकाने भाड्याने दिल्या आहेत. व स्वतः चे अतिरिक्त उत्पन्न सुरू करून घेतले आहे. या पदसिद्ध नगरसेवकाने अतिक्रमण तर काढलेच नाही उलट अजून बीओटी तत्वावर सुरू असलेल्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये दुकान मागत असल्याची चर्चा सुरू आहे. एकतर नगरसेवक त्यात पहिले अतिक्रमण ..!आधीचे अतिक्रमण काढण्यासाठी दुसरे अतिक्रमण..! वर अजून नवीन दुकान..!अजब गजब कारभार ..!असो पहा बुवा अमळनेर करांनो नगरसेवक व्हा दुकान ही मिळवा..!अतिक्रमण पण करा..!नाहीच हे जमलं तर कमीत कमी जास्त पैसेवाले तर बनाच बना..!बघा मग कसं तुमचं अतिक्रमण असो की कोणताही विषय अगदी आरामात दुर्लक्षित केला जाईल..!अशी गरमागरम चर्चा जोरदारपणे गावात सुरू आहे. विशेष म्हणजे या चर्चेत थोडा जातीयवादी प्रवाहआणि मत ही देखील आढळून आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button