रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम थांबवावे व काम करण्यापूर्वी निर्जंतुक झालेल्या पाईपलाईन बदलवावी ; शिवसेनेची निवेदनाद्वारे मांगणीबोदवड:सुरेश कोळीशहरात काही दिवसांपूर्वीपासून अनेक प्रभागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करन्याचे काम चालू झाले आहे. संपूर्ण बोदवड शहरातील प्रभागात कित्येक दशकांपासून पाईपलाईन बदलवलेली नाही आहे. व ती पाईपलाईन निर्जंतुक झालेली आहे व ती अनेक ठिकाणी फुटून जात आहे. त्या रस्त्यावरील काँक्रीटीकरण फोडून त्या पाईपलाईन चे दुरुस्ती करण्यात येत आहे. असे केल्याने त्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडून जात आहे व रस्त्याच्या काँक्रीटीकरण काहीच कामाचे राहत नाही आहे. यामुळे शासनाचा निधी हा फालतू खर्च केला जात आहे व शासनाची यातून आपण फसवणूक करत आहे हे यावरून स्पष्ट होत आहे.
रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम करण्यापूर्वी तात्काळ निर्जंतुक झालेल्या पाईपलाईन बदलवून नवीन पाईप लाईन टाकावी व नंतर कॉक्रीटीकरण करावे जने करून शासनाचा निधी योग्य प्रकारे खर्च होईल व नागरिकांना ही याचा फायदा होईल.जुनी निर्जंतुक झालेली पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल अशी मांगणी शिवसेनेने एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी अल्पसंख्याक शिवसेना जिल्हा उपप्रमुख कलीम शेख, नईम खान, समीर शेख यांनी निवेदन दिले.






