Chalisgaon

चाळीसगाव मध्ये पाण्याच्या पाइपलाइन साठी खोदलेले रस्ते जैसे थे – पावसाळ्यात चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता

चाळीसगाव मध्ये पाण्याच्या पाइपलाइन साठी खोदलेले रस्ते जैसे थे – पावसाळ्यात चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता

मनोज भोसले

चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाइपलाइन शहाराभरात टाकली गेली असली तरी यासाठी रस्त्याच्या कडेला खोदलेले खड्डे ठेकेदाराने लागलीच बजावले पाहिजे असे असताना अनेक खड्यात फक्त माती लोटून ठेवल्याने काही दिवसातच पावसाळा सुरू होणार आहे पावसात याठिकाणी चिखल होऊन राहदारीला मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून सादर काम हे कोरोना व मजुराभावी बंद असल्याची माहिती नगरपालिका पाणी पुरवठा अभियंता अमोल चौधरी यांनी दिली आहे.

याबाबत माहिती अशी चाळीसगाव शहराला शुध्द व वेळेवर पाणीपुरवठा व्हावा यासाठी कोट्यवधी रुपयांची पाइपलाइन योजना शहरात सुरू करण्यात आली यासाठी जुनी पाइपलाइन काढून नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी शहाराभरात रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून त्याठिकाणी नवीन पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली मात्र पाइपलाइन टाकून लगोलग त्याठिकाणी काँक्रीट अथवा डांबरीकरण असो त्यापद्धतीने खड्डे बुजवावे असे असताना गेल्या अनेक महिन्यापासून अर्थात लॉकडाऊन होण्याच्या आगोदर सदर काम झालेले असतांना त्या खाद्यामध्ये फक्त माती लोटून बुजवण्यात आल्याने अनेक ठिकाणी टेकड्या निर्माण होऊन राहदारीला अडथळा निर्माण होत आहे शिवाय शहरातील स्टेशन रोडवर देखील डांबरी रस्ता खोदून त्याठिकाणी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे मात्र रहदारीचा रस्ता असतांना देखील तेथे त्या चारीमध्ये माती दाबली जात आहे, येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे आणि यापावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीमुळे चिखल होऊन राहदारीला अडथळा निर्माण होईल शिवाय चिगट मातीमुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण होणार आहे म्हणून पावसाळा सुरू होण्या आगोदर सदर पाइपलाइन च्या चाऱ्या ठेकेदाराने चांगल्या पद्धतीने (काँक्रीट व डांबरी) पहिल्यासारख्या करून द्याव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

याबाबत माहीती जाणून घेतली असता शहरातील रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चाऱ्याचे काम कोरोना आजार व मजुरांअभावी बंद होते व लवकर हे काम सुरू होणार असल्याची माहिती नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता अमोल चौधरी यांनी दिली,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button