Amalner

आर के नगर येथे नववर्षाचे स्वागत महिलांनी भव्य आनंद मेळाव्याने

आर के नगर येथे नववर्षाचे स्वागत महिलांनी भव्य आनंद मेळाव्याने

अमळनेर

सरत्या वर्षाला निरोप देतांना आर के नगर येथे नववर्षाचे स्वागत महिलांनी भव्य आनंद मेळाव्याने केले. विविध सांस्कृतिक स्पर्धा आणि खाद्यपदार्थ स्टॉलची रेलचेल असलेल्या आनंद मेळाव्यात लहान मोठ्यांसह महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने यात्रेचे स्वरूप आले होते.
आंनद मेळाव्याचे आयोजन स्थानिक महिला कार्यकर्त्या निताताई प्रजापती, सौ.हेमलता पाटील,सौ.रत्ना पाटील आदिंनी केले होते.सरत्या वर्षाला निरोप देतांना नविन वर्षाचे स्वागत उत्साहात व जल्लोषात करण्यासाठी आनंद मेळाव्यात विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात आलेले होते. खवैय्यांसाठी खास खापरावरची पुरणपोळी, भिजवलेल्या मूग डाळीची भजी, विविध चटपटीत चाट पदार्थांचे स्टॉल लज्जत वाढविणारे ठरले.तर बालगोपालांसाठी विविध खेळ व मनोरंजन कार्यक्रम आकर्षण ठरले.
याप्रसंगी आयोजित नृत्यस्पर्धेत मोठ्यासंख्येने मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
मेळाव्यात लावलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलचालक महिला युवतींना शिव प्रतिष्ठाण चे अध्यक्ष रणजित शिंदे यांचे मार्फत उत्कृष्ट स्टॉल धारक व सहभागी स्टॉल धारकांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले. तर नशीबवान प्रवेशिकेचा (लकी ड्रॉ) भाग्यवान विजेता हर्ष लिलाधर प्रजापती ठरला. याप्रसंगी आ.सौ.स्मिताताई वाघ,नगराध्यक्षा सौ.पुष्पलताताई पाटील,आदिंनी यावेळी आंनद मेळाव्यास उपस्थिती देत संयोजकांचा व मेळाव्यात सहभागी स्टॉलधारकांचा उत्साह वाढविला.नृत्यस्पर्धेत प्रथम पारितोषिक कु.शैलजित रणजित शिंदे,द्वितीय कु.श्रद्धा गणेश परदेशी,तृतीय भुवनेश्वरी जगदीश भदाणे यांनी बक्षिसे मिळविलीत.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अपेक्षा पवार, सौ.शितल सावंत, यांनी केले. आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सौ.योगिता पांडे, सौ.निलिमा सोनकुसरे,
अड. मिनाक्षी राठोड, सौ.उषा कासार, करुणा सोनार आदिंनी सक्रिय उपस्थिती देत परिश्रम घेतले. आनंदमेळव्यास सुभाष सुर्यवंशी, नगरसेवक राजेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, प्रविण सातपुते यांचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button