?️अमळनेर कट्टा…अमळनेरात पाण्यासाठी महिला धडकल्या पालिकेत
अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागातील मेहतर कॉलनी परिसरात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतापलेल्या महिलांनी थेट नगरपरिषदेवर हंडा घेऊन मोर्चा काढला. मेहतर कॉलनी परिसराचे नियमित पिण्याचे पाणी मिळत नाही.येथील नागरिकांना अंघोळ काय साधे हातपाय धुवायला देखील पाणी राहत नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून दर उन्हाळ्यात तहानलेली त्यांची गैरसोय होते आहे.ह्याच भागात पाणी येत नसल्याने गैरसोय होते.
यासाठी नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पाण्याच्या टाकीवर व पालिकेवर हंडा मोर्चा काढला होता.
निवेदनात देऊन आमची ही समस्या दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
केवळ मेहतर कॉलनीतच पाणी येत नाही. या परिसरातील बरेच नागरिक हे पालिकेचे कर्मचारी आहेत.दरवर्षी कायमस्वरूपी सोडवावा, अशी विनंती केली आहे. यावेळी समाजसेवक रवी घोगले,मुकेश कलोसे, गुरुजी घोगले, शंकर घोगले, राजेश चव्हाण यासह अनेक नागरिक उपस्थित होते.






