Chalisgaon

ब्राम्हणशेवगे ग्रामपंचायतीतर्फे जाहिरनाम्यातील पाच वर्षात केलेल्या वचनपुर्तीचा आढावा…

ब्राम्हणशेवगे ग्रामपंचायतीतर्फे जाहिरनाम्यातील पाच वर्षात केलेल्या वचनपुर्तीचा आढावा…

ब्राम्हणशेवगे ता, चाळीसगाव सोमनाथ माळी

दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या तीन हजार तीनशे तीन व अकरा सदस्य संख्या. गाव परिसरात नेहमीच दुष्काळी परिस्थिति पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकाना नेहमीच दाहिदिशा वणवण फिरावे लागत होते अशा भिषण परिस्थितित सरपंच पदाचा गाडा दि.११ सप्टेबर २०१४ रोजी सौ.आशा नाना माळी याच्या हातात आला.निवडणूकीत निवडून येण्यासाठी उमेदवार मोठमोठी आश्वासने ,जाहिरनामे,वचने मतदाराना दिली जातात व नंतर विसर पाडला जातो.परंतू सहकार पँनलने आपल्या आश्वासनाची जाणीव ठेवत गावाचा दूरगामी विचार करत गावाची आदर्श गावाकडे वाटचाल सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांचे अथक प्रयत्नातून सुरु झाली आहे. संपुर्ण गाव शेतीवरच अवलंबुन असल्याने त्या पध्दतीने कुठलाही राजकिय अनुभव, वारसा नसताना फक्त गावाचा सर्वागीण विकास कसा करता येईल या प्रामाणिक हेतूने कामास सुरवात केली.ग्रामपंचायतीकडे मनुष्यळ, कर्मचारी कमी असल्याने गावातील नाले सफाई होत नव्हती त्यामुळे घाणीचे साम्राज्य, रोगराईचे साम्राज्य पाहता सर्वात आधी चौदाव्या वित्त आयोगातून संपूर्ण गावात अंडरग्राउंड गटारी करण्याला सुरवात केली.त्यामुळे गावात डास,मच्छरांचे प्रमाण कमी होऊन आजारांचे प्रमाण अगदीच नगन्य झाले आहे.तसेच गावातील प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला असला तर पुढील पिढी गाव विकास साधते याचा सारासार विचार करून लोकसहभागातून शाळा डिजिटल केली. त्याचबरोबर अंगणवाडींचाही चौदाव्या वित्त आयोगातून कायापालट केला. कार्यभार येण्याच्या पाच वर्षापुर्वी स्मशानभूमिचे बाधकाम झालेले होते पण अंधश्रद्धेपोटी व स्मशानभूमि परिसरात असलेल्या काटेरी झाडाचा विळखा यामुळे नाईलाजाने नदी किणारीच अंत्यविधी करावा लागत होता. यासाठी सुरवातीला स्मशानभूमितील संपुर्ण काटेरी झाडाचा विळखा काढत झाडे लागवड केली तसेच लोकप्रतिनीधींकडे स्मशानभूमि सुशोभित करण्यासाठी पाठपुरावा करत पेव्हरब्लाँक व स्मशानभूमिकडे जाण्यासाठी फरशी करून घेतली.तसेच स्मशानभूमीत लोकसहभागातून झाडे लावून जतन करण्यात आली.

२०१५ व २०१७ हा काळ तर अतिशय बिकट असाच होता दुष्काळाची दाहकता येवढी भिषण होती की पंधरा किमी परिसरात पाण्यासाठी पाणी मिळत नव्हते यासाठी ग्रामपंचायतीतर्फे मनॅड धरणावरून माळशेवगे येथील प्रविण महारू पाटील याचे पाईपलाईनद्वारे तात्पुरती पाणी पुरवठा योजना राबवत गावाची कशीबशी तहान भागली.यापुढचे वर्ष तर अजूनच बिकट होते.गाव परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट असाच होता तात्पुर्ती पाणी पुरवठा योजनाही कुचकामी ठरली तीही मिळत नव्हती कारण मनॅड धरणानेही तळ गाठला अशा परिस्थितित गिरणा धरणाचे पाणी जे चाळीसगाव नगर पालिकाच्या पाणी पुरवठा योजनेतून टॅकरद्वारे तब्बल विस किमी वरून व रोज चार ते पांच टॅकरद्वारे गावाची तहान भागवावी लागत होती.हे टॅकर चक्क जूलै अखेरपर्यंत सुरू होते.कार्यकाळातील पाच पैकी तीन वर्ष दुष्काळाची दाहकता भिषण परिस्थिति होती.या भिषण परिस्थितिचे महत्वाचे कारण जरी निसर्ग असला पाऊस कमी जरी पडत असला तरी पावसाचे पाणी अडवण्याची साधन पाहिजे तेवढी नव्हती पडणारे पाणी लगेचच वाहून जाते यासाठी काहीतरी करावे परंतू काय करावे काहीही सुचत नव्हते.अशातच शासनाची जलयुक्त शिवार अभियान योजना सुरू झाली होती.गावाचा या योजनेत समावेश व्हावा यासाठीही संघर्ष करावा लागला.अखेर जुलै महिण्यात पोकलॅन्ड मशिन आले. पावसाळा सुरू झाला असतानाही बारा सीमेंट बाध खोलीकरण व रूदीकरण करण्यात आले यासाठी शासनाचे तब्बल चौतीस लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.

सन २०१८ अखेर हे वर्ष गावाची कात टाकण्याची वेळ संपुर्ण महाराष्ट्र पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धा मध्ये भाग घेऊन आपले गाव दुष्काळमुक्त व पाणीदार करत असल्याने आपणही आपले गाव या स्पर्धेत उतरवून गाव पाणीदार करायचे हा निर्धार करून गावाचा अटीशर्थी पुर्ण करत समावेश केला खरा पण दुष्काळाच्या येवढ्या झळा सोसल्यानंतरही श्रमदानासाठी कोन्हीही धजत नव्हते त्यामुळे बक्षिस जरी मिळाले नसले तरी काम समाधान कारक झाल्याने जलयुक्त शिवार अभियान योजना अंतर्गत डिझेल साठी मदत मिळाल्यामुळे जेसीबी मशिनने धामणी नदी,शेवरी शिवारातील सहा मातीबाध खोलीकरण व रूदीकरण करण्यात आले यामुळे चागला फायदा दिसून आल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण,उज्वलकुमार चव्हाण सर व गुणवंतभाऊ सोनवणे राबवतअसलेल्या शिवनेरी फाउंडेशन भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठाअभियानात सहभागी होत.रोटरी क्लब व सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या पोकलॅन्ड मशिनच्या माध्यमातून तीस मातीबाध,दोन सीमेंट बाध खोलीकरण व रूदीकरण करण्यात आले तसेच धामणी नदी गाळमुक्त करण्यासाठी काम हाती घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लाॅकडाऊन असताना सतरा एप्रिल ते दहा जुन या रखरखत्या ऊन्हात शेतकरी बाधवानी सहा लाख पंचविस हजार रूपये लोकसहभागातून अविरतपणे छप्पन दिवस काम करत तब्बल एक लाख चाळीस हजार घनमीटर काम झाल्याने याकामातून चक्क चौदा कोटी लिटर जलसाठा पहिल्याच पावसात निर्माण झाल्याने गाव दुष्काळमुक्त व पाणीदार होऊन सुजलाम सुफलाम करण्यात यश आले.
याकामामुळे ग्रामपंचायतीतर्फे फक्त गावातीलच कामे न करता शेत शिवारातीलही कामे करता येतात फक्त काम करण्याची मानसिकता,ईच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.

सहकार पँनलच्या जाहिरनाम्यातील वचनपुर्ती करताना गावाचा अतिशय महत्वाचा गाव दरवाजा परिसर बसस्थानक,अगणवाडी, ग्रामपंचायत,जि. प. शाळा, गणपती मंदिर परिसर चौक पेवरब्लाक बसवून व झाडे लाऊन,खासदार उन्मेष दादा पाटील यांचे मार्फत मिळालेले बाकडे बसवून शुशोभिकरण करण्यात आले.
ग्रामपंचायत परिसर व बस फिरण्यासाठी अडचणीचे बसस्थानक परिसरात असलेले अतिक्रमण स्वतः अतिक्रमण धारकांनी काढून घेतल्याने चौकाने मोकळा श्वास घेतला आहे.खासदार निधीतून महादेव मंदिर सभामंडप बांधकाम करण्यात आले आहे.
गावाची महात्मा गांधी तंटामुक्त गाव म्हणून ही ओळख निर्माण केली आहे. गावातील तंटे गावातच मिटवली जातात. त्यामुळे गावाला बक्षिस ही मिळाले या बक्षिसाच्या रकमेतून धामणी नदी लगत सरंक्षण भिंत बांधून महिला वर्गाला दिलासा देण्यात आला आहे.तसेच ग्रामपंचायत मध्ये सदस्य बसतील एवढ्याही खुर्च्या नव्हत्या यामुळे ग्रामस्थांना ग्रामसभेत खाली बसावे लागायचे यासाठी प्रत्येक नागरिक खुर्चीवर बसता यावा यासाठी खुर्च्या,ग्रामपंचायत दप्तरासाठी कपाट व ईतर फर्निचर खरेदी करण्यात आले आहेत.

पर्यावरण रक्षण व वृक्षारोपण…
गाव परिसरात गेली पाच वर्षापासून वृक्षारोपण करण्यात येत आहे.स्मशानभूमी,गणपत मंदिर परिसर, गाव दरवाजा, जि.प.शाळा,समाज मंदिर,मोतीमाता मंदिर,बस स्थानक,हनुमान मंदिर परिसरातही सप्तपर्णी, वड,पिंपळ,लिंब,उंबर,शिसम,करंज,गुलमोहर इ. झाडांचे रोपण करून ती चांगल्या प्रकारे जतन केली जात आहेत. तसेच गाव शिवारात डेरेदार झाडे तोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे निसर्ग संपदा,जैवविविधता वाढू लागली आहे. पक्षी,वन्यजीव प्राणी जसे हरिण,ससे,कोल्हे इ.गाव शिवारात मुक्त संचार करतांना दिसतात. तसेच विविध जंगल संपदा वाढली असल्याने मधमाशी पोळ मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. शिवारात गेली पाच वर्षांत लिंबाची झाडे कमालीची वाढली असून हवा शुद्ध होऊन नागरिकांपासून मधूमेह,दमा,रक्तदाब सारखे दुर्धर आजार दूर पळत असल्याचे चित्र दिसत आहे.पाच वर्षातील दोन ते अडीच वर्षे हेवेदावे, मानपान, रुसवे,फुगवे यात गेले तर शेवटचे वर्षे दि.२२ मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन मध्येच गेले तरी काम करण्याची नैतिकता व निवडणूकीपूर्वी नागरिकांना दिलले आश्वासन, जाहिरनामा पुर्तता करण्यात ग्रामपंचायत सरपंच सौ.आशा नाना माळी यशस्वी झाल्या आहेत.तसेच सरपंच पद असतांना वैयक्तिक लाभार्थी जसे घरकुल, गोठा शेड,शौचालय,शासकीय अनुदान योजना, मनरेगा इ.लाभार्थी यांचे कडून कुठल्याही प्रकारची आर्थिक अपेक्षा, कमिशनची अपेक्षा न ठेवता एक आदर्श निर्माण केला आहे. वैयक्तिक लाभार्थी कडून अशा पद्धतीने सरपंचाचे कमिशन घेण्याची पद्धतच यामुळे बंद केली आहे. असे अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यात आल्यामुळे आज खर्याअर्थाने गावाची आदर्श गावाकडे वाटचाल सुरु झाली आहे.

कुठल्याही गावाचा पाच वर्षात पाहिजे तसा विकास होणे शक्य नाही. अशा पध्दतीने गाव पुढे ही वाटचाल करेल तर ब्राम्हणशेवगे गाव भविष्यात नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही.

भविष्यातील नियोजन…

गावाचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागावा यासाठी वरखेडे धरणापासून पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी सर्वेक्षण पुर्ण झाले आहे.तसेच मनरेगा मधून जि.प.प्राथमिक शाळेस वाँल कंपाउंडचे कार्यादेश आदेश मंजूर झाले आहेत. तसेच दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत१३ लाखाचे कामे समाजकल्याण विभागाकडे प्रस्तावित असून मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहेत. संपूर्ण गावात नवीन पाईपलाईन प्रस्तावित आहे. पंधराव्या वित्त आयोगातून संपूर्ण गाव पेव्हर ब्लॉक ,काँक्रीटीकरण, सुशोभीकरण,घर तेथे शोषखड्डे,परसबाग,वृक्षारोपण इ.उपक्रम, पिण्याच्या पाण्याबरोबरच वापरण्याचे पाणी, सोलर सिस्टीम द्वारे गरम पाणी,गाव सिसिटीव्ही कँमेर्याच्या कक्षेत आणणे.महिला सक्षमीकरण, शेतकरी सम्रुध्द गाव सम्रुध्द योजना राबवणे,युवकांना गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम राबवणे.पाण्याच्या उपलब्धता नुसार पिक पध्दतीत बदल करणे.शेती व्यवसायासाठी जोड व्यवसाय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करणे.सामाजिक वनिकरण विभागाचे मदतीने पडीक, गुरचरण,ग्रामपंचायत च्या बेघरवस्ती जवळ व सरकारी बर्डीलगत मियावाकी पध्दतीचे जंगल निर्मितीचे,निसर्ग बेट संकल्पना राबविण्याचे भविष्यात नियोजन असणार आहे.

सरपंचपदी कार्यरत असतांना गावाची सेवा बजावत असतांना गट, तट राजकीय,वाद बाजूला ठेवून गाव विकास जास्तीत जास्त कसा साधता येईल याकडे लक्ष दिले. यासाठी सहकारी उपसरपंच शांताराम नेरकर, सोनाली पाटील, पुष्पाबाई राठोड, रेखाबाई चव्हाण, नामदेव मोरे सदस्य यांचे बरोबरच विरोधी गटातील दत्तात्रय पवार, जयवंताबाई दाभाडे,बेबाबाई जाधव,वसंत चव्हाण, रविंद्र राठोड सदस्यांनीही विकासाला महत्त्व देत सहकार्याची भावना ठेवली.तसेच तंटामुक्ती समिती अध्यक्ष मा.पं.सं.सदस्य विश्वभर पवार, मदन राठोड,बद्रीनाथ राठोड,जगराम राठोड, उखाबाबा राठोड,नानाभाऊ माळी,पोलिस पाटील राजेंद्र माळी,ज्ञानेश्वर राठोड,धिरसिंग राठोड, जालिंदर बाविस्कर, सुभाष बाविस्कर, बाळासाहेब बाविस्कर,रत्नाकर बाविस्कर,सुधिर राठोड,सुनिल राठोड, न्या.चिंतामण शेळके,मनोज चव्हाण,लक्ष्मण शेळके, विष्णू राठोड,किशोर राठोड, नागु राठोड, सरिचंद राठोड, कांतिलाल चव्हाण, संजय बाविस्कर,अनिल नेरकर,चरणदास चव्हाण यांचेही वेळोवेळी सहकार्य मिळत गेले त्यामुळे गाव गाडा सुरळीतपणे चालवणे शक्य झाले.ब्राम्हणशेवगे ग्रामपंचायतीतर्फे जाहिरनाम्यातील पाच वर्षात केलेल्या वचनपुर्तीचा आढावा…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button