तालुक्यातील पारोळा अमळनेर रस्त्यावरील तपोवन जवळ दोन मोटारसायकलींची धडक.. एक जण जागीच मयत तर दोन जण गंभीर जखमी
नूर खान
तालुक्यातील पारोळा अमळनेर रस्त्यावरील तपोवन जवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर अपघात झाल्याने यात एक जण जागीच मयत झाला व दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारादरम्यान धुळे येथे हलवण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की,आज साडेसहा वाजेच्या सुमारास पारोळा अमळनेर रस्त्यावरील तपोवन जवळ पारोळा कडून अमळनेर कडे जाणारी मोटरसायकल क्रमांक एम एच15 एस 4950 तिच्यावरील चालक नाव माहीत नाही व समोरून येणारी मोटरसायकल एम एच 19 बी बी 9651 वरील चालक मुकेश राजधर चौधरी (वय 30) रा. पारोळा त्याच्यामागे स्वार असलेल्या सडावण येथील हर्षल भिकन बोरसे (वय 17 )हा येत असताना दोन्ही मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाली त्यात एक जण जागीच ठार
झाला तर दोन जण गंभीर स्वरूपाचे जखमी झाले त्यांना पारोळा येथे कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रथमोउपचार करून धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, हर्षल भिकन बोरसे रा. सडावण हा तरुण किसान महाविद्यालयात 11 वीत शिकत आहे महाविद्यालयाची शैक्षणिक सहल जाणार होती त्यासाठी तो मुकेश राजधर चौधरी यांच्या मोटारसायकलला हात देऊन सडावण येथून पारोळा येत होता वाटेतच अपघात झाला व हे दोन्ही गंभीर जखमी झालेत.






