Amalner

अमळनेर चे भूमिपुत्र अप्पर आयकर आयुक्त संदिप कुमार साळुंखे यांनी पाठवली अमळनेर मेडिकल सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साधने….

अमळनेर चे भूमिपुत्र अप्पर आयकर आयुक्त संदिप कुमार साळुंखे यांनी पाठवली अमळनेर मेडिकल सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साधने….

रजनीकांत पाटील
अमळनेर :- अमळनेर येथील
मेडिकल सेंटरमध्ये दिवसरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अमळनेर चे भूमिपुत्र अप्पर आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे यांनी पुण्याहून सुरक्षा साधने पाठवली आहेत. यात ४० संरक्षक सुट्स, १८० मिली चे १०० सॅनिटायझर, २०० मास्क, १०० हॅन्ड ग्लोजच्या जोड्या, पोलिसांसाठी ५० संरक्षक गॉगल्स आणि विना स्पर्श शरीराचे तापमान मोजण्यासाठी १ टेंपरेचर गन (Temperature gun) व ७० किराणा मालाचे किट्स रवाना केले. हे साहित्य पाठवण्यासाठी अमळनेर गटविकास अधिकारी संदीप वायाळ व प्रांताधिकारी सीमा अहिरे वाहन उपलब्ध करून दिले. अमळनेर येथे रुग्ण संख्या जास्त असल्याने कोरोना शी दोन लढण्यासाठी कोरोना योद्ध्याना ही सुरक्षा आयुधे पाठवल्याने अमळनेरचे भूमिपुत्र श्री संदीप कुमार साळुंखे यांचे सर्वत्र तालुक्याभर कौतुन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button