पेठ

विरमाळ ता.पेठ येथे गणपती विसर्जन उत्साहात

विरमाळ ता.पेठ येथे गणपती विसर्जन उत्साहात

विरमाळ ता.पेठ येथे गणपती विसर्जन उत्साहात

ता.पेठ प्रतिनिधी विजय देशमुख
आज अनंत चतुर्दशी सार्वजनिक गणेश विसर्जन सर्वत्र आनंदात उत्साहात चालु आहेे.
 निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी.
चुकले आमुचे काहि त्याची क्षमा असावी.
आभाळ भरले होते तु येतांना ,
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जातांना.

विरमाळ ता.पेठ येथे गणपती विसर्जन उत्साहात
 गणपती बाप्पा मोरया!
 आज विरमाळ ता.पेठ या गावामध्ये गणेश विसर्जनाचा कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला ११दिवस गणरायाची आनंदात भक्तीभावाने  मोठ्या उत्साहाने  पुजा अर्चना करण्यात आली .
 गणरायाच्या उत्सवानिमीत्त गावातील सर्व गावकरी, महिलामंडळ, बालगोपाळ येकत्र येत असतात. ऐक वेगळाच आनंद निर्माण होत असतो. ११ दिवस या आनंदात कसे निघुन जातात ते सुध्दा कळत नाहि.
आज विरमाळ या गावामध्ये आदिवासी परंपरेने गणरायाची मिरवणुक काढण्यात आली .मिरवणुकीसाठी संभळ हे वाद्ये आनले होते.ह्या वाद्य्या वरती माणुस अगदि ठेका धरुन नाचत असतो. अगदि आदिवासी परंपरेने नाचता येते हे ऐक ईको फ्रेंडली वाद्ये म्हणावे लागेल ईतर कर्कश आवाज करणारे वाद्ये हे त्रासदायक असतात. म्हणुन ध्वनि प्रदुषण रोखण्याचा हा ऐक सोपा उपाय . की आदिवासी परंपरेचे वाद्ये असणे हे ऐक काळाची गरज आहेे. विरमाळ येथील गणेश विसर्जन हे ऐक महत्वाचे उदाहरण आले ईतर गणेश मंडळाणे याचे  पालण करणे आवश्यक आहेे. या विरमाळच्या गणेश विसर्जनानिमित्त तरुण वर्ग गावकरी,महिलामंडळ,
बालगोपाळांनि खुप नाचण्याचा आनंद लुटला.पण खरच आपल्यातुन ऐखाद्या जीवलगाला निरोप देतांना डोळ्यातुन अश्रु कसे आपोआप येत असतात. तसेचे गणेश विसर्जनाच्या दिवसी मन भरुन येते. 
गणपती बाप्पा मोरया.पुढच्यावर्षी लवकर या!  असे शब्द तोंडातुन निघताच.तसेच मनाला दु:ख होत की कुनीतरी आपल्याला सोडुन चालले आहेे.
गणपती विसर्जनानिमीत्त 
हिरामण चौरे,दामाजी धुम,भास्करून धुम,गिरीधर भोये,
सुरज धुम,रमन धुम,सुनिता जाधव,फुलाबाई धुम,शाम धुम,गावकरी मंडळी,महिलामंडळ,बालगोपाळ आदि उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button