Chalisgaon

मन्याडच्या पाटचारीतून ब्राम्हणशेवगे पाझर तलावात पाणी सोडावे : जलसंपदा मंत्री जयवंतराव पाटील यांच्या कडे ग्रामस्थांचे साकडे :संवाद यात्रेप्रसंगी दिले निवेदन

मन्याडच्या पाटचारीतून ब्राम्हणशेवगे पाझर तलावात पाणी सोडावे : जलसंपदा मंत्री जयवंतराव पाटील यांच्या कडे ग्रामस्थांचे साकडे :संवाद यात्रेप्रसंगी दिले निवेदन

सोमनाथ माळी चाळीसगाव

चाळीसगाव : येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्ताने राजपुत्र मंगल कार्यालयात राज्याचे जलसंपदा मंत्री जयवंतराव पाटील हे आले होते याप्रसंगी ब्राम्हणशेवगे येथील प्रलंबित मन्याडच्या पाटचारीतून ब्राम्हणशेवगे पाझर तलावात पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.यापुर्वीही जलसंपदा मंत्री असतांना गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील यांनीही यासंदर्भात ग्रामस्थांनी निवेदन देऊन साकडे घातले होते. मन्याडची पाटचारी ब्राम्हणशेवगे गावाजवळूनच गेली आहे. या पाटचारीचा गावाला काहीही फायदा नाही. पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. पाणी ग्रामस्थांच्या डोळ्याला दिसते पण त्याचा फायदा नाही. सदर पाटचारीतून जर पाणी पाझर तलावात सोडले. तर पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचाही प्रश्न कायम स्वरुपी सुटू शकतो. वर्षातून एक किंवा दोन आवर्तनाचे जरी पाणी पाझर तलावात सोडले तरी पाणी प्रश्न मिटणार आहे. यासाठी सदर पाटचारीतून पाझर तलावात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ माळी,मा.सरपंच विजय पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पवार,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button