Chopda

चोपडा येथे शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह प्रवेश व इतर समस्या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन

चोपडा येथे शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह प्रवेश व इतर समस्या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन 
मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाच्या इशारा….

चोपडा येथे शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह प्रवेश व इतर समस्या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
चोपडा येथे तहसील आज आदिवासी विध्यार्थी यांनी  शासकीय वस्ती गृहातील अडचणी संदर्भात तहसीलदार यांना निवेदन सादर केले ,व आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्यासाठी दि.११/९/२०१९रोजी  ठिक १२.००वाजेपासुन आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो प्रयत्न बेमुदत आमरण उपोषण सुरू करू असा इशारा प्रशासन ला दिला, तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देतांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष दारासिंग पावरा, जिल्हा सचिव संजय पाडवी युवा चोपडा अध्यक्ष विनेश पावरा चोपडा तालुका अध्यक्ष नामसिंग पावरा मिथुन पावरा ग्रामीण चोपडा तालुका अध्यक्ष, महेंद्र पावरा, पवन पावरा करण पावरा, प्रशांत पावरा,दिपक पावरा, चुनिलाल बारेला रेहजल बारेला निमिलाल पावरा आदिवासी पदाधिकारी उपस्थित होते,
शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह चोपडा येथील विद्यार्थी व विद्यार्थीनीना वसतिगृहासाठी शासकीय जागा त्वरित उपलब्ध करण्यात यावी
शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह,चोपडा येथील उर्वरित सर्व पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनीना वसतिगृहात त्वरित प्रवेश देण्यात यावा,
संयम योजना बंद करून वसतिगृहाची संख्या वाढविण्यात यावी,
शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृहात पदव्युत्तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना दरवर्षी प्रमाणे वसतिगृहात प्रवेश दिला जात होता मात्र यावर्षी प्रवेश अर्ज रिजेक्ट करण्यात आला आहेत त्यांना त्वरित वसतिगृह फार्म भरून प्रवेश देण्यात यावे ,
सन२०१८-१९ या वर्षाची शैक्षणिक शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी,
शासकीय आदिवासी मुला-मुलीचे वसतीगृह चोपडा येथील रिक्त असलेले गृहपाल,लिपिक पदी तात्काळ कर्मचारी याची नियुक्ती करण्यात यावी,
एल.एल.बी.इंजिनिअरींग,डी,बी.फार्मसी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयात राऊंड चालू असल्याने त्या विद्यार्थी व विद्यार्थीनीनासाठी काही दिवसासाठी वेबसाईट त्वरित चालू करण्यात यावी,
शासनाच्या जीआरनुसार शासकीय वसतीगृह, शासकीय आश्रम शाळा, विना अनुदानित, अनुदानित आश्रम शाळेत सोय सुविधा पुरविण्यात यावी,
मागील व या वर्षी शैक्षणिक वर्षाची निर्वाह भत्ता, डी.बी.टी शैक्षणिक सहलीची रक्कम ताल्काळ देण्यात यावी,
शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृहात प्रवेश पूर्ण झाल्यावर उर्वरित रिक्त जागा राहिले तर गॅप असलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीना प्राधान्य देवून त्वरित प्रवेश देण्यात यावे ,अश्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button