Champa

चांपा येथे नेहरू युवा केंद्र , नागपूर अंतर्गत राष्ट्रीय बालिका दिवस साजरा

चांपा येथे नेहरू युवा केंद्र , नागपूर अंतर्गत राष्ट्रीय बालिका दिवस साजरा

अनिल पवार

चांपा ता , २४:राष्ट्रीय बालिका दिवस दरवर्षी २४जानेवारी रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जातो. याची सुरूवात महिला व बालविकास मंत्रालयात २००८मध्ये केली होती. हा दिवस साजरा करण्याचे उद्दीष्ट म्हणजे देशातील मुलींविरूद्ध होणाऱ्या भेदभावाबद्दल लोकांना जागरूक करणे. २००८पासून हा दिवस संपूर्ण देशात साजरा केला जात आहे.

चांपा येथे नेहरू युवा केंद्र , नागपूर अंतर्गत राष्ट्रीय बालिका दिवस साजरा

यानिमित्ताने चांपा येथे २४जानेवारी शुक्रवारी रोजी सकाळी १०वाजता गट ग्रामपंचायत चांपा येथे नेहरू युवा केंद्र नागपूर – तालुका समन्वयक कु. प्रियंका सूर्यभानजी लोहबरे व ग्रामपंचायत चांप्याचे सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दि . २४ जानेवारी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्ताने ” बेटी बचाओ , बेटी पढ़ाओ” हा कार्यक्रम साजरा करण्यात आला… सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांपा ग्रामपंचायतचे सरपंच अतिश पवार होते.

चांपा येथे नेहरू युवा केंद्र , नागपूर अंतर्गत राष्ट्रीय बालिका दिवस साजरा

” बेटी बचाओ , बेटी पढ़ाओ” जनजागृती रैलीला संबोधित करतांना राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सुरक्षा, शिक्षण, लिंग गुणोत्तर, मुलींचे आरोग्य यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करतेवेळी गावात पथनाट्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये बालिकासाठी जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा राबविल्या याशिवाय बाल लैंगिक प्रमाण आणि मुलींसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गावांमध्ये सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले कार्यक्रमाला मार्गदर्शन करतेवेळी “बेटी बचाओ , बेटी पढाओ” या मोहिमेमुळे लोकांची मानसिकता बदलण्यास मदत झाली आहे, विशेषत: ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाबद्दल बरीच जागरूकता निर्माण झाली आहे. या मोहिमेचा समाजातील लोकांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आहे. आता लोक मुलींना मुलींइतकाच आदर आणि हक्क देत असल्याचे सांगितले .

नेहरू युवा केंद्र नागपूर – तालुका समन्वयक कु. प्रियंका सूर्यभानजी लोहबरे यांनी “बेटी बचाओ , बेटी पढाओ” या जनजागृती रैली कार्यक्रमाला मार्गदर्शन करतेवेळी बेटी बचाओ बेटी पढाओ ही महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली होती. सरकारची ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ ही मोहीम ही मुलींसाठी एक उत्तम पाऊल आहे. या माध्यमातून मुली आणि महिलांशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जातात. भ्रूणहत्यासारख्या स्त्रियांबद्दलच्या अनेक अमानुष प्रथा आता कमी झाल्या आहेत.
या मोहिमेमुळे लोकांची मानसिकता बदलण्यास मदत होत असल्याचे सांगितले .

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विजय विद्यालयचे मुख्यध्यापक श्री विजय नागदेवे व सोबतच जिल्हापरिषद शाळेचे मुख्यध्यापक येरखेडे ,हेमंत तलवारे आदी शिक्षक उपस्थित होते ग्रामपंचायत चांप्याचे उपसरपंच अर्चना सिरसाम व सर्व सदस्यगण , मोठया प्रमाणात गावातील बालिका उपस्थित होत्या…कार्यक्रमादरम्यान चांपा गावात प्रभातफेरी काढुन गावातील लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button