Faijpur

फैजपूर पोलिसांचा अॅक्शन मोड ; रस्त्यावरच थांबवून करीत आहे कोरोना टेस्ट

फैजपूर पोलिसांचा अॅक्शन मोड ; रस्त्यावरच थांबवून करीत आहे कोरोना टेस्ट

फैजपूर सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : एकीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १४ एप्रिलच्या रात्रीपासून कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. शिवाय, रात्रीची संचारबंदी यापुर्वीच लागू आहे. तरी देखील अनेकजण कारण नसताना बाहेर फिरतात. या पार्श्वभुमीवर फैजपूर शहरात रात्रीच्या वेळी रस्त्यावरून फिरणाऱ्यांची फैजपूर पोलिसांनी अँटीजेन टेस्ट करण्यास व विनामास्क फिरणाऱ्याकडून दंड वसूल करण्यात सुरवात केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्यात (१४ एप्रिल) रात्री आठपासून कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंधरा दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून रात्री घराबाहेर पडण्यावरही निर्बंध होते. तरी देखील घराबाहेर पडणारे नागरिक सर्रासपणे रस्त्यावरून फिरताना अनेक ठिकाणी पाहायला मिळत होते. पोलिसांनी यावर शक्कल लढवली. संचारबंदीच्या काळात जे नागरिक रस्त्या बाहेर फिरत असतील अशांची त्याच ठिकाणी रॅपिड अॅटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली असून शुक्रवारी रात्री २५ नागरिकांची टेस्ट करण्यात आली व विनामास्क फिरणाऱ्या १० जणांकडून ३ हजार रुपयांचा दंड फैजपूर पोलिसांनी वसूल केला आहे.

*फैजपूर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये

संचारबंदीच्या काळात बाहेर निघणाऱ्यांवर अंकुश
लावण्यासाठी पोलिस प्रशासनाने ही नामी शक्कल लढविली आहे. याची सुरवात जळगाव जिल्ह्यात ठीक-ठिकाणी व फैजपूर शहारामध्ये सुद्धा करण्यात आली आहे. नगरपालिकेतील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावतीने शहरातील छत्री चौक, बस स्थानक व सुभाष चौकमध्ये संचारबंदीच्या कालावधीमध्ये नागरिक बाहेर फिरत आहेत अशा नागरिकांना पकडून त्यांची रॅपिड अॅटिजेन टेस्ट केली जात आहे. तसेच शहरातील सुभाष चौकात, बस स्थानक, छत्री चौक येथे रात्रीच्या वेळी विनाकारण फिरत असलेल्या प्रत्येक नागरीकाची टेस्ट करण्यात येणार आहे. यावेळी पोलिस निरीक्षण प्रकाश वानखडे, पीएसआय रोहिदास ठोंबरे, डॉ समीर सय्यद, पालिकेचे कर निरीक्षक बाजीराव नवले, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश भोई, बाळू भोई, नामदेव काकडे, ज्ञानेश्वर पवार, देविदास सूरदास, अरुण नमाते, पालिका कर्मचारी शिवा नेहेते, हेमराज बढे, अनिकेत साळुके व यासह होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.

*पॉझिटीव्ह आल्यास तेथूनच विलगीकरण कक्षात

रस्त्यावर तपासणी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण कक्षामध्ये भरती केले जाणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण सापडतील आणि इतरांना त्यांच्यापासून प्रसार होणार नाही; हा मुख्य उद्देश आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत २५ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून व विनामास्क फिरणाऱ्या १० जणांकडून ३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये कुणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही.

फैजपूर पोलीस अॅक्शनमध्ये आले आहेत. पोलिसांनी
सरप्राईज अँटीजेन चाचणी सुरू केली असून शहरातील चौकातून जाणाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे तसेच पीएसआय रोहिदास ठोंबरे यांच्यासह वाहतूक पोलीस दिनेश भोई बाळू भोई यांच्यासह पोलीस कर्मचारी कारवाई करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button