प्रभारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांना निलंबित करा…जनशक्ती संघटना महाराष्ट्र यांची निवेदनाद्वारे राज्य माहिती आयुक्तांकडे मागणीनिलंबन कार्यवाही न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशाराप्रा जयश्री साळुंकेअमळनेर येथील पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांना निलंबित करावे जनशक्ती संघटना महाराष्ट्र यांची निवेदनाद्वारे राज्य माहिती आयुक्त नाशिक यांच्या कडे मागणी केली आहे.
अपिलीय अधिकारी तसेच अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी हेतुपुरस्कर ऍड अलका शेळके मोरे/पाटील यांना स्वतः चे कर्तव्य पार न पडता सत्य माहिती लपविण्याच्या कु हेतूने विना तारीख व विना वेळ असलेले अपिलाकामीचे पत्र देऊन न्याया पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यघटनेतील अनुच्छेद 21 चे उल्लंघन करून सि पि सी ऑर्डर 5 चे देखील उल्लंघन केले आहे. तसेच माहितीचा अधिकार कायदा 2005 चे उल्लंघन केल्या मुळे न्यायदानाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.यामुळे सर्व सामान्य माणसाची दिशाभुल केल्या मुले प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी अमळनेर पंचायत समिती श्री संदीप वायाळ यांना तात्काळ 18/01/2020 पर्यंत निलंबित न केल्यास दि 20 जाने 2020 रोजी महसूल आयुक्त कार्यालय नाशिक येथे संघटने मार्फत सकाळी 10.30 वाजता सामुहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नाशिक जिल्हाधिकारी जळगांव यांना देखील देण्यात आल्या आहेत.






