आंबेगाव तालुक्यात बिरसा अकॅडमी आदिवासी तरुणांना देणार स्पर्धा परीक्षा चं मार्गदर्शन..
प्रतिनिधी : दिलीप आंबवणे
पुणे : आज दिनांक ०१/११/२०२० वार शनिवार रोजी मौजे तेरुंगन,तेरुंगनफाटा ता.आंबेगाव,जि.पुणे येथे आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य व बिरसा ब्रिगेड सह्याद्री शाखा आंबेगाव तालुका यांच्या विद्यमाने क्रांतीवीर भागुजी येथे पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्रांचे उद्घाटन मा.घोडेगाव पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीम.जाधव मॅडम यांच्या हस्ते झाले.
या वेळी आंबेगाव तालुक्याचे स्थानिक पुढारी व लोकनेते शांताराम लोहकरे (चेअरमन) चिंतामण मोरमारे पतसंस्था मा.निवृत्ती गवारी (संचालक चिंतामण मोरमारे पतसंस्था) मा.नामदेव कोंढवळे (पोलीस पाटील) कोंढवळ. मा.सिताराम लोहकरे मा.सरपंच राजपूर.तसेच आदिवासी समाजातील पोलीस अधिकारी या.विकास भारमळ (A.P.I) मा.रविंद्र बांबळे (A.P.I) मा.नंदराज गभाले (P.S.I) मा.काशिनाथ केंगले (तुरुंग अधिकारी नाशिक). मा.दत्तु माळी साहेब बदलापूर.मा.ज्ञानेश्वर पारधी(लेखाधिकारी शिक्षण संचालनालय पुणे)मा.सूधीर घोटकर (स.विक्रीकर अधिकारी ) त्याच प्रमाणे बिरसा ब्रिगेड सह्याद्री अध्यक्ष मा.काशिनाथ कोरडे(सरपंच) बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आढारी उपस्थित होते.
मान्यवरांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,या वेळी
बिरसा ब्रिगेड सह्याद्री अध्यक्ष .मा.काशिनाथ कोरडे यांच्या हस्ते बिरसा ब्रिगेड आंबेगाव,खेड , जुन्नर,मावळ, जुन्नर,अकोले येथील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळी ५९ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.निवासी प्रशिक्षणार्थी संख्या ३५ असुन अनिवासी संख्या २५प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतील.अशी माहीती बाळासाहेब कोंढवळे संचालक व चंद्रकांत लोहकरे व्यवस्थापक यांनी दिली






