Amalner

अमळनेर: प्रेमी युगुल प्रकरण…पोलीस ठाण्यात अपहरण व चोरीचा गुन्हा दाखल..

अमळनेर: प्रेमी युगुल प्रकरण…पोलीस ठाण्यात अपहरण व चोरीचा गुन्हा दाखल..

अमळनेर येथील साई श्रद्धा नगरमधील रहिवासी सीमा सोनार यांनी स्वतःच्याच मुलीविरुद्ध चोरीचा व इतरांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अमळनेर येथील रहिवासी सिमा सोनार यांची मुलगी अनुष्का २५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घरातून निघून गेली. आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यावेळी घराशेजारी राहणाऱ्या छाया परदेशी यांनी तुमची मुलगी घरातून एका चारचाकीत निघून गेली. त्या गाडीत चार मुले बसली होती. असे सांगितले. त्यानंतर घरात शोध घेतला घरातील 4 तोळ्यांच्या ३ लाख २० हजार रु किंमतीच्या दोन पोत , 4 तोळ्यांच्या ३ लाख २० हजार रु किंमतीचे दोन हार ,साडे तीन तोळ्यांच्या एक लाख ४० हजार रु किंमतीच्या दोन सोन्याच्या साखळ्या आणि 3 लाख रुपये रोख असा १० लाख ८० हजार रु च्या वस्तू आणि रोख रक्कम नसल्याचे लक्षात आले . मुलीला फसवून डाव साधून घरातून लूट केली. सीमा सोनार यांनी तक्रारी नुसार मोईन, अनुष्का या प्रेमी युगुलासह अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात कट करून अपहरण ,चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील करत आहे.
आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button