विद्यार्थी काँग्रेसचे “न्याय दो आंदोलन”
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच लागलेल्या निकालात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असून हजारो विद्यार्थ्यांना अनपेक्षितपणे नापास करण्यात आले आहे. या विरोधात आज सोमवार रोजी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यापीठातील परीक्षा भवनवर “न्याय दो” मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. तसेच परीक्षा नियंत्रक योगेश पाटील यांना निवेदन देऊन निकाल पुन्हा लावण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे विद्यापीठ अध्यक्ष योगेश बहादूरे, प्रदेश महासचिव अजय रणनवरे, निलेश आंबेवाडीकर, विकास थाले व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






