Pune

चोखोबा ते तुकोबा’ समता वारीच्या पत्रकाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते अनावरण ..

चोखोबा ते तुकोबा’ समता वारीच्या पत्रकाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते अनावरण ..

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : समतेचा संदेश देणार्‍या ‘चोखोबा ते तुकोबा-एक वारी समतेची’ या वारीच्या पत्रकाचे अनावरण भारताचे सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते आज पुणे येथे करण्यात आले .

वारीचे हे चौथे वर्ष असून, १ जानेवारी २०२२ रोजी मंगळवेढा येथील संत चोखामेळा समाधी मंदिरापासून वारीला सुरूवात होणार आहे. १२ जानेवारी २०२२ रोजी ही देहू येथे समारोप होणार आहे. ही वारी महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यातुन जाणार आहे. समाजातील वाढत जाणारी दरी, जातीयता, नक्षलवाद, दहशतवाद आदी विषयांवर जागर करण्यात येणार आहे. संतांनी सांगितलेला समता विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही वारी निघत आहे.

सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी ‘चोखोबा ते तुकोबा’ वारीचा उपक्रम स्तुत्य असून, समाजात समता अन बंधुभाव वाढीस लागावा यासाठी हि तरूण मंडळी प्रामाणिक प्रयत्न करत असुन , मी स्वता तुमच्या पाठीशी कायम उभा आहे,अशी वारी समाजाची गरज पूर्ण करेल, असे सांगून त्यांनी समता वारीला मनापासून शुभेच्छा दिल्या.

या शिष्टमंडळात निमंत्रक सचिन पाटील , ऋषिकेश सकनुर , मनोज भालेराव शरद शिंदे. यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button