Aurangabad

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मुख्यमंत्री निधीत २० लाखांची भर..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मुख्यमंत्री निधीत २० लाखांची भर..

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने मुख्यमंत्री सहयाता निधी ‘कोविड-१९’ अंतर्गत ८१ लाखांचा निधी आजपर्यंत देण्यात आला आहे.

मा. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी जिल्हाधिकारी मा.सुनील चव्हाण यांच्याकडे निधीचा धनादेश सुर्पुद केला.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वेतनात एक/दोन दिवसांचा निधी जमा करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले.

या आदेशानंतर मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या आवाहनानूसार संवैधानिक अधिकारी, वर्ग एक अधिकारी व प्राध्यापक यांनी दोन दिवसांचे वेतन तर उर्वरित कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा निर्णय घेतला.

३८१ जणांचा २० लाख ६८ हजार रुपयांचा निधी जमा झाला. यामध्ये कुलगुरू, प्रा-कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह सर्व संवैधानिक अधिकारी, अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी योगदान दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button