Aurangabad

घृष्णेश्वर मंदिरासमोर टेम्पो-दुचाकीचा अपघात, एक ठार, एक जखमी..

घृष्णेश्वर मंदिरासमोर टेम्पो-दुचाकीचा अपघात, एक ठार, एक जखमी..
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : छाेट्या टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोलापूर- धूळे महामार्गावरील वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरासमोर आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान झाला.
या अपघातात रामदास तान्हा सौंदाणे (२८, रा. सायगव्हाण, ता. कन्नड) हे मयत झाले असून, प्रदीप बाळासाहेब पाटील (३२) हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील सायगव्हाण येथील रामदास तान्हा सौंदाणे व प्रदीप बाळासाहेब पाटील हे बँकेच्या कामानिमित्त औरंगाबादला दुचाकी क्रमांक (एमएच १४ जीएक्स २४४७)ने आले होते.
आपले काम आटोपून ते गावी परत जात असताना, वेरुळ येथे घृष्णेश्वर मंदिरासमोर त्यांच्या दुचाकीला कन्नडहून खुलताबादकडे जाणारा छोटा टेम्पो क्रमांक (एमएच १६ एवाय ५३०९)ने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील रामदास तान्हा सौंदाणे यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रदीप पाटील हे गंभीर जखमी झाले. जखमीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button