Rawer

महाशिवरात्री निमित्त जय मल्हार मित्र मंडळा तर्फे शिव पार्वती विवाह संपन्न.

महाशिवरात्री निमित्त जय मल्हार मित्र मंडळा तर्फे शिव पार्वती विवाह संपन्न.

निंभोरा बुद्रुक ता.रावेर संदिप कोळी

रावेर येथे पहिल्यांदाच जय मल्हार मित्र मंडळा तर्फे महाशिवरात्री निमित्त शिव पार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला दक्षता समिती सदस्या आशाताई सुधाकर धनगर यांच्या घरासमोरील बेलाच्या झाडाखाली सजीव देखाव्यासह शिव पार्वती ची आरास करून विवाह सोहळा आनंदात व उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्याचे मंगलाष्टक बबनराव जोशी यांनी म्हटले. कोमर बारी यांनी शंकराची भुमिका केली होती तर दिव्या केळकर यांनी पार्वती मातेची भुमिका केली होती. सजीव देखावा पाहून भाविक भाराऊन गेले व हर हर महादेवचा गजर करून फरिसर दुम दुमुन काढला. या विवाह सोहळ्यास गावातील जेष्ठ, श्रेष्ठ नागरीकांन सह पत्रकार सुनिल कोंडे, ग्रा.प.स दिलशाद खान सर, श्रीराम मंदिरचे अध्यक्ष अनिल बऱ्हाटे, रविद्र बारी आदिंनी उपस्थिती दिली. या विवाह सोहळ्यात भाविकांनी नृत्याचा देखिल आनंद घेतला. असा शिव पार्वती विवाह सोहळा निंभोरा येथे धनगरवाड्यात पहिल्यांदा पार पडला. सर्वांनी घरासमोर सळा रांगोळी टाकून दिवे लावून केळीचे खांब उभे केले होते सजावट पाहून जनू दिवाळी असल्याचाच भास होत होता. गावात सर्वत्र या विवाह सोहळ्याचे कौतुक होत आहे. या अनोख्या विवाह सोहळ्यासाठी विषेश सहकार्य म्हणून राजीव बोरसे यांच्या कडून साउंड चे तर ललित पाटील यांच्या कडून टेंन्टचे आयोजन करण्यात आले होते सोहळ्यास रामकृष्णा सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, राजू सोनवणे, गोलू बारी, जगदिश सोनवणे, संदिप सोनवणे, प्रियंका सोनवणे, कांचन सोनवणे, गायत्री सोनवणे, देवयानी सोनवणे, ओम बारी, पुर्वेश सोनवणे, शुभम धनके आदि जय मल्हार मित्र मंडळाच्या कार्य कर्त्यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button