महात्मा फुले माध्यमिक विद्यालय आणूर चे घवघवीत यश
सुभाष भोसले -कोल्हापूर
सातारा येथे झालेल्या १४ वर्षाखालील शासकीय विभागीय कुस्ती स्पर्धेत तृप्ती आप्पासो गुरव हिने ३६ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन करणेत आले.
सदर खेळाडूस प्रशिक्षक शिवाजीराव जामनिक वस्ताद व प्रभाकर कापडे तसेच तिचे वडील आप्पासाहेब गुरव व आई अनिता आप्पासो गुरव त्याच बरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री चौगुले व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुधीर बंडगर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.






