?️ अमळनेर कट्टा…प्रचाराच्या तोफा थंडावल्या.. 16 गावे संवेदनशील तर 52 केंद्रावर लक्ष…जवळपास 40% जागा बिनविरोध..पोलीस तैनात… नाकबंदी आणि गस्त सुरू…
अमळनेर येथील 67 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्याची प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून 67 ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवार १५ जानेवारी 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक पाहता तगडा पोलीस बंदोबस्त लावला असून सुरक्षेच्या दृष्टीने निवडणुका शांततेत पार पाडण्याकरिता अनेक मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये पोलिसांची विशेष नजर असणार आहे.अवैध धंद्यांवर कारवाई तसेच ग्रामपंचायतींचा आढावा घेतला आहे.सेक्टर प्रमाणे अधिकाऱ्यांची नियुक्ती,योग्य ती नाकाबंदी करण्यात आली असून अवैध दारू,अवैध गोष्टींना आळा घालण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव यांनी दिली आहे.
7 अधिकारी,111 कर्मचारी,14 महिला कर्मचारी 89 होमगार्ड,89 महिला होमगार्ड,4 पोलीस पेट्रोलिंग झोन ,4 महसूल पेट्रोलिंग झोन,100 मीटर वर एक कर्मचारी, 1 आरसीपी,सकाळी आणि संध्याकाळी नाकाबंदी,रात्रीची गस्त पथक तैनात असून मोबाईल व्हॅन एक अधिकारी 3 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.अवैध दारू, अवैध पैसे वाटप किंवा वाहतूक यासाठी नाकाबंदी सुरु आहे.अशी माहिती अमळनेर चे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी दिली आहे.
अश्या आहेत ग्राम पंचायत..
एकूण 67 ग्राम पंचायतींमध्ये 16 संवेदनशील ग्राम पंचायतीत एक टाकरखेडा(बिनविरोध झाली),तर उर्वरित 15 मध्ये पिंपळी,शिरूड, गांधली, पातोंडा, पिळोदे, धावडे, वासरे, मांडळ,तांदळी, प्र. डांगरी, एकलहरे, पाइसे, मेहेरगाव,निभोरा, कळमसरे ह्यांचा समावेश असून या ग्राम पंचायतींवर विशेष लक्ष असणार आहे. तसेच 52 ग्राम पंचायती साधारण आहेत.तसेच 3 ग्राम पंचायतीत मुस्लिम मतदारांची संख्या अधिक असल्याने परदा नशीन 3 केंद्रे असणार आहेत.पातोंडा, सारबेटे बु. आणि मांडळ येथे मुस्लिम महिला मतदार अधिक आहेत.या तीन गावांना जास्त महिला कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.४१ टक्के जागा बिनविरोध झाल्याने प्रशासनावरील ताण कमी झाला आहे.ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत २१३ प्रभागातील ५४३ पैकी २२२ जागा तालुक्यातील म्हणजे सुमारे ४१ टक्के जागा बिनविरोध झाल्या आहेत.
९००पेक्षा जास्त मतदार असणाऱ्या चार केंद्रांची दोनभागात विभागणी करण्यात आली आहे.तसेच योग्य ती तयारी पूर्ण झाली असून प्रशासन कुठेही कमी पडणार नाही…अशी माहिती -मिलिंद वाघ, तहसीलदार, तथा निवडणूक अधिकारी अमळनेर यांनी दिली आहे.






