लोणंद शहरांमध्ये कोंबड्याचा रूप असलेली कोंबडी नैसर्गिक चमत्कार
दिलीप वाघमारे
कुसुर तालुका फलटण येथील प्रगतशील बागातदार वसंतराव ज्ञानदेव ठोंबरे हे लोणंद शहरामध्ये लोणंद फलटण रोडवरील सरदे ओढा नजीक कापडगाव फाट्याच्या लगत अनेक वर्षे राहतात आणि त्यांची मिनी पोल्ट्री देशी कोंबड्यांची आहे त्या पोल्ट्रीमध्ये लहान पिल्लू सांभाळ करून पाच महिन्यानंतर कोंबड्या चा आकार असलेली कोंबडी अंडी घालू लागली हे दैवी चमत्कार असल्याने निसर्गाचा अविष्कार पाहावयास मिळत आहे त्यामुळे कोंबड्याचा रूप असलेली कोंबडी या परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे हे पाहण्यासाठी पंचक्रोशीतील महिला पुरुष आबालवृद्ध ही कोंबडी पाहण्यासाठी दिवसात दिवस गर्दी करीत आहे अशी कोंबडी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन खाते यांनी याचे निदान करून अशी पैदास केव्हा होती का हा चमत्कार म्हणावा लागेल याबाबत निष्कर्ष निघणे गरजेचे आहे. या निसर्गाच्या चमत्काराचा पर्दाफाश पशुसंवर्धन खाते यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत चाचणी करून याचा शोध येणे गरजेचे आहे असे यादी सर गाजर होऊ लागले तर नवलच होऊ शकते याला नैसर्गिक चमत्कारच असून याचा उलगडा होणे काळाची गरज आहे.






