Aurangabad

शहरातील सव्वीस आस्थापणांवर कारवाई

शहरातील सव्वीस आस्थापणांवर कारवाई
गणेश ढेंबरेऔरंगाबाद
औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरीता राज्य शासनाने अनेक कडक नियम घातले आहेत. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकाने व आस्थापना ह्या नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
आणि पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी उपजिल्हाधिकारी, कामगार उपआयुक्त महानगरपालिका व महसूल अधिकारी यांची बैठक घेतली.
या बैठकीनंतर स्वत: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरातील शहागंज, किराडपुरा, जालना रोड अशा अनेक ठिकाणी पाहणी दौरा करुन नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानांवर आणि आस्थापनांवर कारवाई केली.
विशेष भरारी पथकात कामगार उप आयुक्त, औरंगाबाद कार्यालयातील अधिकारी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातील अधिकारी, महसुल विभागातील अधिकारी, महानगर पालीकेतील कर्मचारी व पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता. दिवसभरात शहरातील 26 आस्थापनावर कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button