? मंथन…दोन महीन्याचा पगार थकीत म्हणता म्हणता तिसरा महीना भरत आला … पण पगार अजुनही गुलदस्त्यातच का ?
औरंगाबाद गणेश ठेंबरे
एकीकडे परिवहनमंत्री गरीब कामगारांच्या भावनेशी , अस्मितेशी खेळुन राहीले तर दुसर्या बाजुने संघटना झोपा काढुन राहील्यात हे वास्तविक चित्र दिसते …
एसटी कामगारांना पगार मिळवुन देणे ते ही नियोजित कालावधीत हे परिवहन मंत्र्यांचे काम … पण परिवहन मंत्री जर निष्काळजी पणा करत असतील तर त्यांना त्याची जाणीव करुन देण्याचे काम संघटनेचे ..
आज कामगारासोबत परिवाराचे हाल होता येत … कामगाराचा परिवार रस्त्यावर येण्याच्या स्थितीत आहे … याकडे लक्ष देण्याची व जातीने लक्ष देण्याची आज गरज जेवळी प्रशासनाची आहे तेवढीच संघटनेची सुद्धा …
आता म्हणाल पत्र व्यवहार , भेटीगाठी सुरु आहेत वा केल्यात … पण समाधान जर वेळेत मिळत नसेलतर एखादी आंदोलनाची नोटिस संघटनेने दिली का ?…
प्रशासन आणि कामगार यातील जो दुवा आहे तो दुवा जर निष्काळजीपणा करत असेल तर.
कामगारांचे पगार झाले नाहीत आणि आणखी दोन महीने झाले नाहीत तरी केंद्रीय पुढार्यांना फरक पडणार नाही … मग जेव्हा आपल्या व आपल्या परिवारावर उपाशमारीची वेळ येईल तेव्हा आपण जागे होणार काय ?…
प्रत्येक वेळी जर कामगारच परिस्थीती कशी हाताळायची , परिस्थितीचे निवारण कसे करायचे याचा आलेख जर मांढत असेल तर आपल्या अस्तित्वावर प्रश्न उभे होणार नाहीत का ?…
प्रशासन देत नाही म्हणुन आपण दवाबही बनवु नये … हे न उलगढणारे कोढे …
आज घडीला एसटीत पंधरा ते वीस टक्के कामगार हा कोणत्या तरी रोगाने ग्रासीत आहे .. दर महीण्याला औषधीला पैसा लागतो .. सोबत परिवारही चालवावा लागतो … दोन प्रेमाचे बोल फक्त दोन दिवस उपाशी राहण्यापुरतेच उपयोगी पडतात पण तिसर्या दिवशी काय ?… अश्यात जर वेळेवर पगार झाला नाही आणि सदर कामगार उपचारा म्हणजे औषधी अभावी मरण पावला तर त्याची जिम्मेदारी प्रशासन घेणार की संघटना ?… हे स्पष्ट करुन द्या … जो जो ज्या संघटनेशी जुडलेला आहे त्या त्या संघटनेने तसं एकदाचे स्पष्ट करावे …
कामगारांचा व कामगारांच्या परिवाराचा दर दोन महीण्यांनी तमाशा बघणारे दोन घटक कधी आपली जिम्मेदारी पुर्णतः निभवतील देव जाणे … स्वतःची किर्ती स्वतः सांगण्यापेक्षा … कर्म असे करा की दुसर्याच्या मुखातुन न राहावुन आपली(तुम्हंची) किर्ती त्याच्या मुखमंढलातुन निघलीच पाहीजे … शंभरातुन दहा जरी व्यक्त झाले तरी आपल्याला पंढरीचा विठोबा पावला हे समझण्यास हरकत नाहीच.
हा गुपचुप बसण्याचा खेळ आज जीवावर बेततोय .. यापेक्षा मैदाण गाजवुन जीव गेला तर जीवन सार्थक झाला असे समझु .. पण मैदाण गाजविण्यासाठी नेतृत्व करणार कोण हा प्रश्नही आजघडीला महत्वपूर्ण आहे … कारण तीन संघटनांचे त्रिमूर्ती सरकार आज सत्तेत आहे आणि ह्या तीनही संघटना कामगार हित ओढखुन आंदोलनाचा पवित्रा घेतील याचे दुरदूरवर तरी चित्र दिसत नाही .
ज्याला जे समझायचे ते समझा … ज्याला नाराज व्हायचे ते नाराज व्हा … पण पगारासाठी काहीतरी योग्य पाउल उचला.
लिहायला भरपुर आहे … पण जिथे प्रत्येक गोष्ट सुरवातीपासुन समजावी लागते तिथे लिहुनही फायदा हा होत नाही … एसटीतील संघटना आणि गांधीजीचे तीन बंदर … यांचा आपसांत काही ताळमेळ जुळलं तर नाही ना ?… असाही प्रश्न मनात येतो आणि असाह्य वेदना देउन जातो.






