Amalner

?️अमळनेर कट्टा…शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ ला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..पण रस्त्यावरची गर्दी कमी होईना..!बंदोबस्ताचे नामोनिशाण नाही..

?️अमळनेर कट्टा…शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ ला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..पण रस्त्यावरची गर्दी कमी होईना..!बंदोबस्ताचे नामोनिशाण नाही..

अमळनेर- कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शासनाने राज्यात दि.१५ एप्रिल पासून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत काही निर्बंध जाहीर केले आहेत. मागील दोन दिवसांपासून या नियमांना नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. शनिवार व रविवार हे दोन दिवस संपूर्ण बाजारपेठेत दुकाने बंद असली तरी रस्त्यावरची गर्दी काही कमी झाली नाही. तर काही प्रशासनाच्या जावायांनी कोणतेही नियम पालन केले नाही.बाजारपेठेत काही ठिकाणी तर रस्त्यावर काही लोटगाडी धारक गाड्या लावून फळे विकतानाआढळून आले. तर दारू ची अनेक दुकाने चोरून लपून सुरू असलेली आढळून आली.काही केक शॉप देखील सुरू असल्याचे निदर्शनास आले. परंतु ही काही मंडळी आधी पासून प्रशासनाला ठेंगा दाखवत आली आहे. त्यांनी लॉक डाऊन च्या पहिल्या,व अगदी आताच्या फेस मध्ये ही नियमांचे उल्लंघन केले आहे. परंतु शासकीय कर्मचारी, अधिकारी यांचा वरद हस्त असल्याने त्यांना दंड ही होत नाही आणी ते कोणाला घाबरत देखील नाहीत.त्यांच्या म्हणण्यानुसार अधिकारी त्यांच्या खिश्यात आहेत.

दरम्यान उस्फुर्त पणे बंद पाळण्याचा निर्णय किराणा व धान्य व्यापारी संघटनांनी घेतला होता त्या अनुषंगाने संपूर्ण बाजारपेठेत संबधित दुकाने काटेकोरपणे बंद होती.

नियमांचे उल्लंघन – कारवाईची गरज

अमळनेर शहरात दररोज लॉकडाऊन असला तरी काही मंडळी विनाकारण गावात फिरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेक व्यवसाय जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट असल्याने बाजारात गर्दी नसली तरी लॉकडाऊन असून नसल्यासारखी परिस्थिती दिसून येत होती. याबाबत सोशल मिडीयात रोष व्यक्त करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेतून आली आहे.

काल लॉक डावूनच्या पहिल्या दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने उत्कृष्ट कार्य करत विनाकारण फिरणाऱ्या रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर विविध कार्यवाही केल्या आहेत. यात मास्क न लावणे,नं प्लेट नसणे,नं प्लेट चुकीची असणे,लायसन्स नसणे,ट्रिपल सीट फिरणे इ नियम न पाळणाऱ्या लोकांवर स्टेशन रोड, सुभाष चौक,बस स्थानक भाग,धुळे रोड, पैलाड इ भागात चोख बंदोबस्त ठेवत कार्यवाही केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button